नवी दिल्ली दि.२१: २०२४मध्ये देशातील महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला काही महत्वाचा सूचना केल्या आहेत. ही कामे 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा असेही निवडणूक आयोगाने कळविले आहे.
लोकसभा निवडणुकी पाठोपाठ आता देशातील चार महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर्षी सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही तयारी निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक आयोगाने राज्यांना 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादी अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदार यादी अपडेट केल्यानंतर निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर कधीही जाहीर करण्याची शक्यता आहे.
#सत्यप्रभा न्युज #नवि दिल्ली