नांदेड दि.११: नांदेडच्या गाडेगाव परिसरातील असना नदी पुलावरील लोखंडी पाईपचे कठडे दोन्ही बाजूंनी तुटले आहेत. त्यामुळे पुलावरून जाणा-या वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वर्षापासून हे तुटलेले कठडे अपघाताला आमंत्रण देत असताना सार्जनिक बांधकाम विभागाला मात्र कठडे दुरुस्तीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले असून रात्रीच्यावेळी पुलावरून जाताना वाहनचालकांना अनेक अडचणी येत आहेत. दरम्याण नांदेड येथून अध्रांप्रदेश येथे जाण्यासाठी गडेगाव येथील हा प्रमुख मार्ग असल्याने नेहमीच या महामार्गावर वाहनांची रेलचेल पहावयास मिळते. याच रस्त्यावर तीन ते चार विद्यालये असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोटर सायकल, सायकली व पायदळ जाणे येणे करतात. ब्राम्हणवाडा व मुगड मार्गाचे काम नव्यानेच झाले असून रस्ता रूंद करण्यात आला आहे. मात्र पुलाचा आकार जैसे थेच असल्याने पुलाचा भाग अरूंद आहे. त्यामुळे यावरून जाणा-यांना सुरक्षेच्या दृष्टीने कठडा महत्त्वाचा आहे. अनेकवेळा मोठी मालवाहू वाहने या पुलावर आल्यास इतररांना जाताना अनेक अडचणी येतात. अश्यावेळी दुचाकीस्वारांना पुलावरून खाली नदिपात्रात पडण्याची भिती नेहमीच असते. कठड्यापासून वाहने अंतर राखून चालत असल्याने ते अगदी जवळजवळ येताना दिसून आले आहेत. यातूनच काही अपघात घडलेले आहेत. दोन महिन्यापुर्वी अश्याच एका अपघातात तालुक्यातील एका युवकाला प्राण गमवावे लागले होते. तेव्हाही कठड्याच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याने, या विभागाला आणखी काही मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे काय? असा सवाल परिसरातील ग्रामस्थानी उपस्थितीत केलाय.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड