नविन दिल्ली दि.२३: : अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या तुरुंगातून आप कार्यकर्ते, भारतीय जनतेसाठी एक व्हिडिओ संदेश पाठवला आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शनिवारी (दि. २३ मार्च) मुख्यमत्री अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. या संदेशात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ‘कोणताही तुरुंग मला आत ठेवू शकत नाही, मी बाहेर येऊन माझे वचन पूर्ण करीन आणि देशाची सेवा करत राहिल. माझे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित आहे. मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे.’ अशा आशयाचे व्हिडिओ स्टेटमेंट सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवले.
दिल्लीतील ‘आप’चे कार्यालय सील; जेलमधून गैंग चालवली जाते सरकार नाही-भाजप
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘तुरुंगा’तून पाहणार दिल्लीचा कारभार: आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी मद्य घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने गुरुवारी रात्री अटक केली. केजरीवाल यांच्यावर चार्जशीट दाखल होऊन कोर्टात केस चालेल आणि कोर्टाच्या निकालानंतरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे ठरेल. कारण मंत्री वा मुख्यमंत्र्याला अटक झाल्यानंतर त्यांनी पद सोडावे की नाही, याबाबत संविधानात कोणतेच प्रावधान नाही. परंतु कोर्टात जर आरोप सिद्ध झाला आणि कोर्टाने सदरील व्यक्तीला शिक्षा ठोठावली तरच पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तूर्त केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रहावे लागणार आहे. केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवणार आहेत, असे ‘आप’ नेत्या आतिशी मार्लेना यांनी म्हटले आहे.
देशात प्रथमच मुख्यमंत्रीदावर असलेल्या नेत्याला जेलमध्ये जावे लागले आहे. यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही ईडीने अटक केली होती, मात्र त्यांनी कारवाईपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. गुरुवारी (दि. २१ मार्च) ईडीच्या १२ अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांची दोन तास चौकशी केली. त्यावेळी त्यांचे आणि कुटुंबीयांचे फोन जप्त करण्यात आले होते. त्यानंतरही केजरीवाल सहकार्य करत नसल्याचे सांगत ईडी पथकाने रात्री ९ वाजता त्यांना अटक केली.सर्च वॉरंटसह ईडी पथकाने मुख्यमंत्री निवासस्थानी जावून अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यावेळी मोठ्या संख्येने ‘आप’ कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासस्थाना बाहेर जमले होते. आम आदमी पक्षाने या अटकेला लोकशाहीची हत्या म्हटले आहे. ईडीने केजरीवाल यांना यापूर्वी ९ समन्स पाठवले होते, मात्र ते चौकशीस हजर राहिले नाहीत. केजरीवाल यांच्या अटकेला कोर्टानेही संरक्षण दिले नाही.
जेलमधून गैंग चालवली जाते; सरकार नाही- मनोज तिवारी
आप नेत्या आतिशी मार्लेना यांच्या, ‘मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देता केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील’ या वक्तव्यावर भाजप नेते मनोज तिवारी यांनी ‘जेलमधून गैंग चालवली जाते; सरकार नाही,’ अशी बोचरी टिप्पणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंतत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने भाजपकडून केली जात आहे.
‘आप’चे कार्यालय सील:
दिल्ली येथील आम आदमी पक्षाचे कार्यालय सर्व बाजूंनी सील करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात प्रवेश कसा बंद केला जाऊ शकतो?हे भारतीय संविधानात दिलेल्या ‘लेव्हल प्लेइंग फील्ड’च्या विरुद्ध आहे. याविरोधात तक्रार करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडेवेळ मागत आहोत, असे आप नेत्या आतिशीमार्लेना यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिले आहे.
दिल्लीच्या शाहिदी पार्कवर ‘आप’चे निदर्शन:
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्ली येथील शाहिदी पार्कवर आम आदमी पक्षाच्यावतीने निदर्शन करण्यात आले. मुख्यमत्री केजरीवाल यांच्या अटकेला ‘आप’ने लोकशाहीची हत्या म्हटले आहे. यावेळी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड