हदगांव प्रतिनिधी शुभम तुपकरी/- दारवा येथील कार्यरत असलेले त्वचारोग तज्ञ डॉक्टर रुपेश खंदांडे यांचा वाढदिवस अनाठाई खर्च न करता त्यांच्या मित्रपरिवारांनी रुग्णांना फळ वाटप करून १ जानेवारी रोजी साजरा केला.
तालुक्यातील हदगाव शहरातील त्वचारोग तज्ञ डॉक्टर रुपेश खंदांडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च करून वाढदिवस साजरा करण्याची सध्या प्रथाच बनली आहे, याला अपवाद म्हणून सर्वत्र मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ग्रामीण, गोरगरीब आदिवासी जनतेच्या खाजगी, शासकीय कोणत्याही कामाकरिता सदैव धावून जाणारे म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. रुपेश खंदाडे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या मित्र परिवारांनी हदगाव येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करते वाढदिवस साजरा केला यावेळी जयवंत शिनकरे, सुदीप जाधव, श्याम लोंढे, शिव सुभे, अभिजीत आवटे, सतीश राऊत, सागर चावरे, दत्ता नेवरकरप यांची उपस्थिती होती.