नांदेड: नांदेड जिल्हयातील पोलीस स्टेशन अर्धापुर व नांदेड ग्रामीण हद्दीत सोनारांच्या दुकानातून बेंग लिफ्टींगचे गुन्हे घडलेले होते. सदर गुन्हयांना आळा बसणेकामी व सदरचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांना स्वतंत्र पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सपोनि रवि वाहुळे य पोलीस अंमलदार यांचे एक स्वंतत्र पथक नेमून त्यांना सूचना दिल्या होत्या.
पो.स्टे. अर्धापुर व पो.स्टे. नांदेड ग्रामीण हद्दीतील गुन्हयांच्या अनुषंगाने सदर पथकाने पो.स्टे. अर्धापुर व नांदेड ग्रामीण हद्दीतील गुन्हयांच्या घटनास्थळी जावून भेट देवून माहिती घेतली असता आरोपींची गुन्हे करण्याची पध्दत एक सारखी असल्याचे निदर्शनास आले. सदर गुन्हयांच्या अनुषंगाने अधिकची माहिती घेतली असता आरोपी हे बाहेर राज्यातील असल्याचे माहिती मिळाली असता मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांचे आदेशान्वये सदर पथकास तेलंगणा, आंध्रप्रदेश व ओडीसा राज्यात आरोपींचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आलेले होते. सदर पथकाने बाहेर राज्यात जावून दोन्हीही गुन्हयातील आरोपीना निष्पन्न केले. सदर आरोपींनी नांदेड येथे देखील किरायाने रुम केल्याची माहिती प्राप्त झालेली होती. सदर माहितीच्या आधारे सापळा लावून व सतत शोध घेवून निष्पन्न आरोपी नामे दिपक इसफुल प्रधान, वय 21 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. दाहीसाही, मुंडामल, व्यासनगर, जाजपुर रोड, जि.जाजपुर राज्य ओरीसा यास ताब्यात घेण्यात आले आहे.
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/12/image_editor_output_image927370918-1702131805710-1024x599.jpg)
सदर आरोपीस विश्वासात घेवून पो.स्टे. अर्धापुर गुरनं 405/2023 कलम 379,34 भादंवि व पो.स्टे. नांदेड ग्रामीण गुरनं 839/2023 कलम 380,34 भा.दं.वि. च्या गुन्हयांबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीकडून कडून 4,23,000/- रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयातील इतर आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे देण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्वा.गु.शा, नांदेड, सपोनि श्री रवि वाहुळे, सपोउपनि माधव केंद्रे, मोना/पद्यसिह कांबळे, पोना/ विपक पवार, पोना/संजीव जिंकलवाड, चायोकॉ/कलीम शेख, पोहेकों/दिपक ओढणे, पहेिकों/रान् सिटीकर, पोहेको मारोती तेलंग, पोहेकों/गुंडेराव करले, पोहेकों/सुरेश चुगे, पोकों/ देवा चव्हाण, पोकों/गणानन बवनवाड, पोकों/ ज्यालासिंध बावरी, चापोका हनुमानसिंह ठाकूर, पोहेकॉ संग्राम केंद्र, पोका मारोती मोरे, धम्मानंद जाधव यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक पांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड