विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.१२: विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप उमेदवारांत तुल्यबळ लढत सुरू आहे. महायुतीच्या उमेदवार असलेल्या अनुराधा चव्हाण यांनी प्रचारादरम्यान मतदारसंघ पिंजून काढला आहे. महायुतीत असूनही शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार जिल्हाप्रमुख रमेश पवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यामुळे जनतेत वेगळा संदेश जात होता, शिवाय शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही याबद्दल नाराजी व्यक्त करत होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रमेश पवार यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीला शिंदे गटाचे कोणतेही समर्थन नव्हते, हे स्पष्ट झाले आहे.
सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात स्थानिक भाजप पदाधिकारी आक्रमक आहेत. लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काम केल्याचा वचपा ते काढत आहेत. अशा स्थितीत फुलंब्रीत शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार रमेश पवार आणि कन्नडमध्ये केतन काजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बळ दिले जात होते. मात्र रमेश पवार आणि केतन काजे यांच्या कारवायांना पक्षीयस्तरावर कोणतेही समर्थन नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवून दिले आहे.
अर्ज भरला. नेत्यांनी आदेश देऊनही अर्ज मागे घेतला नाही. अखेरीस शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. तसे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी काढले आहे.
मराठा मतदान ठरणार निर्णायक…
या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीने मराठा उमेदवार दिले आहेत. त्यामुळे मराठा मतदान निर्णायक ठरणार आहे. अपक्ष म्हणून मंगेश साबळे रिंगणात होते. मात्र त्यांनी माघार घेतली, अन्यथा मराठा मते आणखी विभागली गेली असती. या मतदारसंघावर हरिभाऊ बागडे यांनी भगव्याचे वर्चस्व कायम ठेवले आहे. अनुराधा चव्हाण यांच्या रुपाने ते वर्चस्व कायम राहते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर