नांदेड दि१३ : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते शंकरराव चव्हाण, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार राजेश पवार, ज्येष्ठ नेते भाऊराव देशमुख, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माजी आमदार अमर राजुरकर आदी उपस्थित होते. कवळे गुरुजी यांच्या भाजपा प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपाला आणखी बळ मिळेल असे प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी सांगितले. श्री.कवळे गुरुजी यांनी नायगाव विधानसभा मतदार संघात दुध डेअरी, गूळ उत्पादन, सहकारी पतसंस्था आणि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घ काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ नांदेड महापालिकेच्या 55 माजी नगरसेवकांसोबतच भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड