तुषार कांबळे : (हदगाव प्रतिनिधी)

हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे हदगाव विधानसभेचे आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर पत्रकार परिषद आयोजन करण्यात आले होते. त्यात आ कोहळीकर यांनी महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षक अधिकारी संरक्षण अधिकारी अधीक्षक ही पदे सध्या नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन आमदार कोहळीकर यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईनुसार ही भरती प्रक्रिया पारदर्शक सुद्धा होत असताना मागच्या भरतीमध्ये पैशाचे भरपूर अफरातफर झाली आहे याची जाणीव आहे परंतु ही भरती आपल्या गुणवत्तेवर आधारित आहे. त्यामुळे ही नोकर भरती मध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी यांना एक रूपया सुद्धा देण्याचा अधिकार नसताना अंगणवाडी मदतनीस नोकर भरती ही मेरिटनुसार गुणवत्तेवर आधारे निवड प्रक्रिया होणार असुन. परंतु ज्यांची निवड अगोदर होत आहे अशाच परीक्षार्थीना निरोप देऊन तुमची भरती करतो अशी हाक एसडीपीओ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे काही दलालामार्फत होत आहे. असा आरोप हदगाव विधानसभेचे आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यासंदर्भात कोणासोबतही पैशाचा आर्थिक व्यवहार करू नये सदर नौकर भरती अतिशय पारदर्शक पार पडण्यात येत आहे. जर या नोकर भरतीमध्ये काही अनुसूचित घटना घडल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य शिर कारवाई करण्यात येईल या नोकर भरती प्रक्रियेत कोणत्याही मेहनती गुणवत्ताधारक लाभार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी अर्ज धारकांनी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये संबंधित नोकर भरती अतिशय परदर्शकपणे होणार असल्याचेहि गवाही आ. कोहळीकर यांनी बोलून दाखविले आहे त्यामुळे माझ्या हदगाव विधानसभा मतदारसंघातील मी जनतेला आव्हान करू इच्छित आहे. की कोणासोबतही या भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार करू नये. तसेच या पत्रकार परिषदेत मतदारसंघातील अतिशय ज्वलंतशिर महत्त्वाचा मुद्दा *जल जीवन चे काम अतिशय ते निकृष्ट दर्जाहीन झाले असून काही गावे या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. जलजीवन वॉटरग्रीड ह्या योजना फक्त पुरताच मर्यादित असून फक्त श्रेय घेण्यासाठीच याचा येऊ उपयोग झाला असल्याचा आमदार कोहळीकर यांनी माजी आमदार जवळगावकर यांना नाव न घेता लगावला. संदर्भातील पुढील अधिवेशनात हा मुद्दा मी स्वत सभागृहात उपस्थित करणार असल्याचे बोलून दाखवले मतदारसंघातील अतिशय निकृष्ट व बोगस जलजीवन च्या नावाखाली चांगले सीसी रोड संबंधित ठेकदारांनी धातुमातुर काम करून रस्ते खोदून टाकले याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक जी देशमुख, ज्येष्ठ शिवसैनिक संभाराव लांडगे, मा जि परिषद सदस्य अनिल पाटील बाभळीकर, युवा सेनेचे संदेश पाटील हडसणीकर, महिला आघाडीचे शितलताई भांगे पाटील, शहरप्रमुख बबन माळोदे माळी सभापती बाबूसराव कदम, स्वीय सहाय्यक बबन कदम, व तसेच इतर कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.
@## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##@