वाईन मार्ट बनले तळीरामांचे अड्डे; छेडछाडीच्या घटना वाढल्या रस्त्याच्या वाटसरुंना व विद्यार्थ्यांना केले जात आहे टार्गेट
नांदेड दि.२४: वाईन मार्टमधून दारू विकत घेतल्यानंतर त्या वाईन मार्टसमोरच दारू प्राशन करण्याचा प्रकार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्ट समोर तळीराम भररस्त्यावर, रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून किंवा जिथे जागा उपलब्ध होईल तिथे मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे चित्र दिसून येते आहे या तळीरामांचा बंदोबस्त करण्यात विमानतळ पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे आता पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
आनंदनगर व शारदानगर भागातील वाईन मार्टवर सुरू असलेल्या अनागोंदी प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही. पाणी पाऊच, ग्लास सर्वच प्रकारचा चकणा उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे तळीराम येथेच मद्य प्राशन करून कायद्याला पायदळी तुडवित आहेत. त्यामुळे प्रशासनांने वेळीच कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदालेन करण्यात येईल अशा ईशार आ.बालाजीराव कल्याणकर यांचे खंदे समर्थक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मुन्ना राठौर यांनी दिला आहे
नांदेड शहरात अनेक वाईन मार्टमध्ये सध्या दारु विक्रीचा व्यवसाय मोठ्या जोमाने करीत आहेत. दिवसेंदिवस मद्यप्राशनकरणाऱ्या तरुणांची संख्या वाआहे. बिआर बारमध्ये बसून दारू पिण्याची ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही किंवा त्यांना ते आवडत नाही अशी ती मंडळी वाईन मार्टमधून दारू विकत घेतल्यानंतर आपल्या घरी अथवा बंदिस्त खोलीत दारू पिणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने कायद्याला पायदळी तुडवित हे तळीराम भररस्त्यातच आणि वाईन मार्टसमोर अथवा आनंदनगर व शारदानगर येथे पुन्हा रस्त्यावरच मद्द प्राशन करतांना दिसून येत आहेत .
यासाठी वाईन मार्टमधून किंवा अगदी लागून असलेल्या दुकांनामधून पिण्यासाठी पाण्याचे पाऊच, (प्लास्टिक बंदी असतांना)ग्लास, चकना, भाजलेले शेंगदाणे, खरमुरे आदी साहित्यही पुरविले जात आहे त्याबरोबरच वाईट मार्टमध्येच चकण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने तळीरामांची
सध्या मजा सुरू आहे.
दुसरीकडे कायदा पातळी तुडविला जात असतांना याकडे मात्र पोलीस प्रशासन लक्ष देण्यात तयार नाही, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसून येते. तळीरामांकडून अनेक महिला मुलींची छेड काढण्याचा घटना आनंदनगर व शारदानगर भागातील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. त्यासोबतच गुन्हेगार प्रवृत्तीची काही मंडळी ही रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या सभ्य माणसांना विनाकारण वाईट संबोधण्याचा प्रकार सुरू आहे. असे असतांनाही संबंधित विभाग मात्र मूग गिळून गप्प असल्याने या भागातील तळीरामांचे मनसुबे वाढले आहेत.
ऑटो रिक्षाचा केला जातो मद्यप्राशनासाठी वापर
वाईन मार्ट समोर किंवा अगदी थोड्या अंतराबर रिक्षा उभी करून त्यात सहा-सात जण बसून मनसोक्त मद्यप्राशन करतात आणि मद्याची झिंग चढताच खाली उतरुन ये-जा करणाऱ्या वाटसरू व विद्यार्थ्यांना दमदाटी व शिवीगाळ करतात त्यामुळे या परिसरात कायम भयभित वातावरण निर्माण झाले आहे
हा प्रकार थांबला पाहिजे..!
वाईन मार्ट सकाळी चालु झाल्यापासुन ते रात्री बंद होईपर्यंत तळीरामाची गर्दी याठिकाणी कायम राहते या वाईन मार्टवरुन दारु खरेदी करुन वाईन मार्टच्या समोर,बाजुला थांबुन दारु पित आहेत.
त्यामुळे रस्त्यावरील चालणाऱ्या महिला,तरुण मुलीना तसेच जेष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. एखादी अनुचीत घटन घडल्यास यास जबाबदार कोण राहील, सदर भागामध्ये शाळा, ट्युशन आहेत या मुळे लहान मुलावर वाईट परिणाम पडत आहेत. पाणी पाऊच व प्लास्टिक ग्लासवर बंदी असतांना सुद्धा खुलेआम पाणी पाऊच
विकल्या जात आहेत हा प्रकार थांबला पाहिजे अशी मागणी टायगर ग्रूप चे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पैलवान बाळासाहेब जाधव यांनी केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड