विजय पाटील
लातूर दि.२८:
रोजी पहाटे पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील एका हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये एका अज्ञात इसमाचा अज्ञात आरोपीने डोक्यात दगडाने मारून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळण्यात आला होता. त्यामध्ये प्रेत पूर्णपणे जळाले होते.काही वेळातच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे इतर पोलीस अधिकारी व अमलदारांनी सदर ठिकाणी धाव घेऊन घटनास्थळास भेट दिली.घटनास्थळाची व परिस्थितीची पाहणी करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात व सूचनेवरून अज्ञात मयताची ओळख पटविण्यासाठी व अज्ञात मारेकरीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके तयार करून रवाना करण्यात आली.
दरम्यान सदर पथकांनी तात्काळ कार्यवाही करत अवघ्या काही तासातच अज्ञात मयताची ओळख पटवली असता सदरच मयताचे नाव लक्ष्मण सुभाष गजघाटे, राहणार रबाळे पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, पंचशील नगर, क्रांती चौक, नवी मुंबई
असे असून तो दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी लातूर येथील तिच्या बहिणीकडे औषधोपचार करण्याकरिता आला होता. तो सतत दारू पीत असल्याने त्याच्यावर औषध उपचार करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. दिनांक 26/10/ 2024 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण गजघाटे हा बाहेर जाऊन येतो म्हणून बाहेर पडला तो रात्र झाली तरी आला नाही अशी माहिती मिळाली. मरण पावलेल्या इसमाच्या अंगावर असलेल्या घड्याळ व इतर साहित्याची ओळख पटल्याने मयताच्या भाऊजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करण्यात आली असता त्याने त्याचे नाव 1) सचिन शिवाजी वाघमारे, वय 45 वर्ष, राहणार बर्दापूर तालुका, अंबाजोगाई जिल्हा बीड.
असे असल्याचे सांगून तो मागील पंधरा वर्षापासून एकट्यानेच लातूर शहरात राहून भंगार गोळा करतो असे सांगितले. तसेच त्याच्याकडे लक्ष्मण गजघाटे याच्या मृत्यू बाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मी दररोज झोपत असलेल्या जागेवर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झोपलो होतो. मध्यरात्री एक अनोळखी इसम दारू पिऊन तेथे आला व मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तेथून हाकलून दिले मी तेथून घाबरून निघून गेलो व तो स्वतः माझ्या अंथरुणावर झोपी गेला. थोड्या वेळाने परत त्याच ठिकाणी आलो असता तो माझ्या अंथरुणावर गाढ झोपलेला दिसल्याने मला त्याची चीड झाली व मी बाजूला जाऊन थोड्या अंतरावर असलेला दगड घेऊन येऊन त्याच्या डोक्यावर चार ते पाच वेळेस मारले. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने झोपलेल्या अंथरून-पांघरूनाला आग लावल्याचे सांगून सदरचा खून त्यानेच केल्याचे कबूल केले आहे.एकंदरीत परिस्थिती पाहता नमूद गुन्ह्यातील आरोपी व मयत हे एकमेकाला ओळखत नसून त्यांचा आप-आपसामध्ये काही एक संबंध नाही तसेच या गुन्ह्यातील आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसून अतिशय किरकोळ कारणावरून सदरचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच यापूर्वी लातूर जिल्ह्यात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचे अवलोकन करता खूनाचे कारण अतिशय किरकोळ असून त्यातूनच सदरच्या घटना घडल्या आहेत.
आतापर्यंत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न असून त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. लातूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सज्ज असून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात रात्रगस्त, सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, खुर्रम काझी, संजय कांबळे, विनोद चलवाड ,युवराज गिरी, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, रियाज सौदागर, मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, राहुल कांबळे, चंद्रकांत मुंडे, बंडू निटुरे यांनी केली आहे.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर