मतदारांच्या विश्वासाला ५ वर्षात कधी तडा जाऊ देणार नाही : कोहळीकर
हिमायतनगर प्रतिनिधी दि.२९: हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मला भरघोष मतदान देऊन विजयी केले त्याबद्दल मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला व लाडक्या बहिणींच्या विश्वासाचे फलित म्हणजे मी माझा विजय हिमायतनगर शहरातील जनतेसाठी वाहून टाकतो व मी पाच वर्षात कधीच तुमच्या विश्वासाला तडाजाऊ देणार नाही असे सांगत दिनांक 29 नोव्हेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून नवनिर्वाचित आमदार कोहळीकर हे प्रथमच शहरात आल्या मुळे त्यांना सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणले की आता मी मतदार संघातील जनतेचा पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले…
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 29 नोव्हेंबर रोजी हदगाव हिमायतनगर विधानसभेवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर हे प्रचंड बहुमताने निवडून आले त्यामुळे त्यांनी आज शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील महादेवाचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यासह सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आले असतात त्यांचा शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून त्यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना कोहळीकर म्हणाले की हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीव ओतून काम केले आहे आणि या कार्यकर्त्यांच्या व तुमच्या विश्वासाला साथ मी साथ देत सर्व लाडक्या बहिणीसह लाडक्या भावांचे व मतदार बांधवांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मला मतदान रुपी भरभरून आशीर्वाद दिले त्या सर्वांचे सुद्धा आभार मानून भविष्यात मी जनतेचा पाच वर्ष सालगडी म्हणून काम करणार आहे विकासाच्या बाबतीत कधीही मी कुठेही कमी पडणार नाही लवकरच जनता दरबार घेऊन मी प्रत्येक गावात भेटी देत विकास कामे करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची त्यांनी या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सांगितले व सर्व उपस्थित जनतेचे आभार मानले
यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ,शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख,विकास पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य लांडगे मामा, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, गजानन तुप्तेवार प्रसाद डोंगरगावकर, वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद तथा बांधकाम सभापती सदस्य प्रताप देशमुख, शिवसेना शहर अध्यक्ष गजानन हरडपकर, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष गजानन चायल, चीतांगराव सर, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद,विलास वानखेडे, उदय देशपांडे,जुनेद भाई, सत्यवृत्त ढोले ,राजेश जाधव, रवी जाधव,रामभाऊ सुर्यवंशी,सुनील चव्हाण,राम नरवाडे, अनवर खान पठाण, ज्ञानेश्वर पुठेवाड सह कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड