नांदेड दि.२३: IBPS/TCS अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा पदभरती परीक्षेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या एस.आय.टी. चौकशीच्या मागणीसह अन्य विविध मागण्यासाठी विद्यार्थ्यांचा अक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात तिव्र असंतोष दिसून आला. मोर्चामध्ये हजारो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. यामध्ये प्रामुख्याने सरळ सेवा भरती जिल्हा शासनाने खाजगी कंपनी मार्फत घेतला आहे तो निर्णय रद्द करून सर्व सरळ सेवेच्या पीरक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच घेण्यात याव्या. अशी विद्यार्थ्यांची मागणी प्रामुख्याने मोर्चात दिसुन आली. हा मोर्चा ऑनलाईन परीक्षा विरोधी कृती समिती मार्फत आयोजीत करण्यात आला होता. तरी खालील मागण्या करण्यात आल्या.
१) (IBPS/TCS) या खाजगी ऑनलाईन कंपन्याद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वच विभागातील पदभरती प्रक्रिया रद्द करून निवडणूक पूर्व कालावधी तात्काळ एम.पी.एस.सी. आयोगामार्फत घेण्यात याव्यात. २) तलाठी व इतर विभागातील सरळ सेवा पदभरतीत झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. ३) नुकत्याच जाहीर केलेल्या पोलीस भरतीचे आयोजन फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात यावे. ४) शिक्षक भरती एकाच टप्यात ६७ हजार रिक्त पदे भरण्यात यावी व इंग्रजी माध्यमांचे मराठी माध्यमावरील अन्यायकारक प्रसिद्धीपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावी. ५) मध्यप्रदेश / राजस्थान या राज्यांच्या धरतीवर पेपरफुटीवर महाराष्ट्रतही कडक कायदा करून फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी. ६) राजस्थान/मध्येप्रदेश राज्याच्या धर्तीवर परीक्षाशुल्क स्मार्ट कार्ड योजना महाराष्ट्रात राबवून विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्का मधुन होणारी आर्थिक पिळवणूक तात्काळ थांबविण्यात यावी. ७) राज्यातील कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळांचे सामूहिकरण थांबवण्यात येऊन, जिल्हा परिषद शाळा समक्ष करण्यात याव्यात. ८) एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. / पूर्व मुख्य एस.एस.सी. व इतर केंद्रीय परीक्षांचे परीक्षा केंद्र नांदेड शहरात देण्यात यावे. ९) सारथी, बार्टी, महाज्योती दोन्ही चाळणी परीक्षेत अनुक्रमे संभाजीनगर/नागपूर परिक्षेत गोंधळ झाल्याने संबंधीत सर्व संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून सरसकट फेलोशिप देण्यात यावी. १०) सर्व विभागातील पदभरतीमध्ये कोरोना कालावधीतील दोन वर्षे वयामर्यादा शिथिलतेचा दि.०३/११/२०२२ च्या GR नुसार पुढील वर्षी होणाऱ्या पोलीस भरती व कंम्बाईन भरती, एम.पी.एस.सी. व इतर सरळसेवेच्या भरतीप्रक्रियेमध्ये वयामध्ये सवलत देण्यात यावी. ११) महावितरण विभागात होत असलेल्या पदभरतीत सहाय्यक / कनिष्ठ उमेदवारांना यांना वय व अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे तसेच गेट परीक्षा रद्द करण्यात यावी. १२) प्राध्यापकांची व शिक्षकांची भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी. १३) हरियाना राज्याच्या धर्तीवर इयत्ता ९ वी ते १२ वी साठी टी.ई.टी. पेपर ३ लागू करावा. टी.ई.टी. व सेट पेपर ऑफलाईनच घेण्यात यावेत. तसेच प्रत्येक वर्षी टि.ई.टी. घेण्यात यावी. १४) कर्नाटक राज्याच्या धर्तीवर (UBI) बेरोजगार भत्ता महाराष्ट्रात तात्काळ चालू करण्यात यावा.
वरील मागण्या संदर्भात आय.टी.आय. चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ऑनलाई परीक्षा विरोधी कृती समितीचे प्रा. बळवंत शिंदे, तुषार देशमुख, अतुल रांवड, विरभद्र डखणे, शशिकांत क्षीरसागर, गणेश ढगे, मयुर शिरफुले, गोविंद कदम, संजय चौफाडे, ज्ञानेश सावंत, चंद्रकांत चंदणकर, अविनाश टरके, लखन जाधव, दत्ता पाटील, अविनाश जाधव, शंतनु पाटील, आनंद शिंदे ओम स्वामी इ. परिश्रम घेतले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड