विजय पाटील
पैठण दि. १७: येथील खुल्या कारागृहातील कैदी सुभाष रमेश केंगार (वय ३२, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) याने जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. खून केल्याने तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
नाशिक येथील जेलरोड कारागृहातून त्याला १६ फेब्रुवारी २०२४ रोजी उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पैठणच्या खुल्या कारागृहात आणण्यात आले होते. बुधवारी सकाळी कारागृहाच्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी १२ कैद्यांना पाठविण्यात आले होते. मात्र ११ कैदी काम करत होते, केंगार गायब होता. जेल अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला असता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातील सिमेंटच्या कठड्यावर त्याचा मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास केला जात आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर