छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विजय पाटील दि : १७ हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिर येथे भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याकरिता तातडीने प्रस्ताव सादर करावा, यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असे आश्वासन पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी (१५ सप्टेंबर) दिले.
हरसिद्धी माता मंदिरात महाप्रसाद कार्यक्रमास पालकमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. मंत्री सत्तार यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंदिर परिसराची पाहणी केली. उपस्थित महिलांशी लाडकी बहीण योजनेबाबत संवाद साधला. येथे आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. या वेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाढे, शिरीष बोराळकर, श्रीराम पाटील महाजन, किशोर बलांडे, विजय औताडे, पुनमचंद बमणे, अनिस पटेल, हरिदास हरणे, संजय हरणे, नारायण सुरे, रावसाहेब औताडे, भिमलाल हरणे आदींसह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व भाविकांची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर