
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,अनुभव उत्तमोत्तम अभिनव देऊन जातात अशाच एका कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आज दिनांक 30 जानेवारी रोजी हिमायतनगर पोलीस स्थानकात संपन्न झाला यावेळी बोलताना बी.डी.भुसनुर म्हणाले की मी प्रशासकीय काळानुसार लोकसभेच्या पार्श्वभूमीवर माझी लातूर येथे बदली झाल्यामुळे मी हिमायतनगर करांचे प्रेम कदापी विसरणार नाही येथील नागरिकांनी माझ्या कार्यकाळात शहरात जातीय सलोखा कायम ठेवत पोलीस प्रशासनास सहकार्य केले माझ्या बरोबर माझ्या सहकाऱ्यांवर दाखवलेल्या विश्वासाचा मी सदैव ऋणी राहील अशा भावनिक शब्दात त्यांनी निरोप समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या


लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या नांदेड पोलीस अधीक्षकांनी केल्या आहेत त्यामध्ये हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांची लातूर येथे बदली झाल्यामुळे हिमायतनगर पोलीस स्थानका कडून त्यांचा दि 30 जानेवारी रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता समारंभाच्या अध्यक्षस्थानी गणेशराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक भाई,श्री परमेश्वर देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ उपस्थित होते यावेळी बोलताना गणेश शिंदे यांनी असे सांगितले की ग्रामीण भागात पोलीस प्रशासनाचे काम करत असताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्याबरोबरच तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत शहरात सर्व जाती धर्मांना एक ठेऊन शांतता प्रस्थापित करण्याला महत्व देणारा अधिकारी म्हणून भुसनुर यांची ओळख होती त्यांच्या बदलीने आम्ही एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी आज गमावत आहे अशा भावना व्यक्त केल्या बि.डी.भुसनुर यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर हिमायतनगर पोलीस स्टेशनला अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही त्यामुळे त्यांनी हिमायतनगर पोलीस स्टेशनचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्याकडे देऊन येथील गावकऱ्यांचा निरोप घेतला त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांनी बि. डी.भुसनूर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांना निरोप दिला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, हिमायतनगर चे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष जावेद भाई, अन्वर खान सदाशिव सातव ,शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे ,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चांयल, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड , काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, विलास वानखेडे, राजू अप्पा बंडेवार, प्रवीण कोमावार, सुधाकर पाटील,रामभाऊ सुर्यवंशी, वामन पाटील मिराशे,योगेश चिलकावार, सह हिमायतनगर शहरातील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील ,पत्रकार सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते