नांदेड प्रतिनिधी: मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी भारत सरकार शिष्यवृत्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची प्रलंबित रक्कम त्वरित विद्यार्थ्यांना मिळावी या संदर्भात वाठोरे लक्ष्मण यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे शासन आपल्या दारी या उपक्रमात मागणी केली.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की मागील दोन वर्षांपासून विद्यार्थी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून वंचित आहेत अर्ज भरून दिले असून पण काही विद्यार्थ्यांना अद्याप योजनेची कोणतीही रक्कम मिळाली नसून विद्यार्थी हे आर्थिक संकटात सापडलेले असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून पण मागील वर्षीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली नसून शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून या दोन्ही मागण्याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ मदत करणे गरजेचे आहे असे लक्ष्मण वाठोरे यांनी म्हटले आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड