नांदेड प्रतिनिधी:
26 नोव्हेंबर भारतीय संविधान स्वीकृती दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड येथे प्रवेशद्वारावर संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण डॉक्टर सुरज एंगडे हॉवर्ड विद्यापीठ अमेरिका यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी भंते पण्याबोधी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, संघ ,सुशील चिकटे,डॉ यशवंत चव्हाण, व्यंकटराव किडेपाटील, उत्तमराव सोनकांबळे सहसंचालक कोषागार औरंगाबाद ,ज्योती बगाटे अतिरिक्त जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड , डॉ.रवी सरोदे डॉ. शिवाजी काकडे ,दिगंबर मोरे ,दिगंबर कांबळे, सविता बोधनकर ,रेणुका तमलवार सहाय्यक आयुक्त रोजगार व डॉ सुचित्रा मोरे , इंजि. पडघणे, मंगेश कदम, सुकेशिनी जमदाडे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. तरुणांनी सर्वप्रथम उच्च शिक्षणाला महत्त्व देऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी जमीन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे व त्या ला केंद्र करून चळवळी उभारले पाहिजे असे प्रतिपादन याप्रसंगी डॉ.सुरज एंगंडे यांनी केले. लहान राज्य निर्माण झाली पाहिजे जेणेकरून प्रशासकीय व शासकीय कामांना गती मिळेल. रस्त्यावरच्या लढाया करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान चळवळ मध्ये आणि बुद्धीजिवी नी केला पाहिजे.स्वतःची स्वप्न मोठी ठेवा भलेही त्यावर इतरांनी हसली तरी चालेल पण एक दिवस येईल तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करून इतरांना सन्मानित करण्यासाठी मजबूर कराल. विदेशात शिक्षणासाठी विद्यार्थिनी जाण्यास प्राधान्य द्यावे जगभरात आंबेडकरवादी विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजदूत म्हणून पसरले पाहिजे असे याप्रसंगी त्यांनी मत व्यक्त केले. मनुस्मृती चे विचार आज संपुष्टात येऊन भारतीय संविधानाला आपण स्वीकारत केल्यामुळे आजपासून भीम युवाचा प्रारंभ झाल्याचे याप्रसंगी दीपक कदम येणे स्पष्ट करून आंबेडकरवादी मिशन हे शिक्षण क्रांतीसाठी कार्य करत आहे त्यामुळे चळवळीचे केंद्र हे शिक्षण असावे असे याप्रसंगी त्यांनी मत विशद केले याप्रसंगी ज्योती बगाटे उत्तम सोनकांबळे डॉक्टर यशवंत चव्हाण डॉक्टर रवी सरोदे दिगंबर मोरे सुकेशिनी जमदाडे आदींनी आपली मते व्यक्त केली.
यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकणारी ऐश्वर्या चिकटे यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला. किंग्स कॉलेज लंडनमध्ये शिकणाऱ्या विश्वजीत मुंगे यांच्या आईचा सुद्धा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
मिशन केंद्रामध्ये समाजाच्या वतीने डॉ सुरज इंगंडे यांचा भाव्य सत्कार याप्रसंगी करण्यात आला. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड