नांदेड – सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रात भरीव कामगिरी केल्या बद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय यशस्विनी उद्योजिका पुरस्काने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याचे आयोजन २२ जून रोजी बालगंधर्व रंग मंदिर,पुणे येथे करण्यात आले होते.हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषिमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते राजश्री पाटील देण्यात यांना आला. यावेळी जेष्ठ कवी लेखक जावेद अख्तर, जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी व सेंटरच्या कार्याध्यक्ष संसदरत्न खा.सुप्रिया सुळे, फौजिया खान, विद्या चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी सत्कार उत्तर देतांना राजश्री पाटील म्हणाल्या की, हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या या प्रवासात जोडलेल्या प्रत्येक भगिनी व बांधवांचा आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यासाठी मी अविरतपणे प्रयत्न करणार आहे. राजश्री पाटील गेली २४ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ज्या महिला घराच्या बाहेर येत नव्हत्या अशा महिलांना एकत्र करून त्यांचे बचतगट स्थापन केले. पुढे त्यांना बँकेशी जोडणे व्यवसायासाठी प्रवृत्त करणे, त्यांना आर्थिक साक्षर करणे, बँकेच्या माध्यमातून भांडवल उभे करून देणे. यातून त्यांनी बचतगट चळवळ उभी केली. पुढे त्याचे रूपांतर गोदावरी अर्बनची या संस्थेत झालं. या संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना प्रत्यक्ष रोजगार तर विविध उद्योगांच्या माध्यमातून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे केले. या त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राजश्री पाटील यांचा यशस्विनी उद्योजिका पुरस्कार देऊन गौरव केला.
या पुरस्काराचे हे दुसरे वर्षे असून सामाजिक, साहित्य, उद्योजिका, पत्रकारिता, कृषी व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या केवळ सहा महिलांना राज्यातून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्काराची निवड प्रक्रियेत राज्यभरातील हजारो महिलांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून यातून अत्यंत तळमळीने कार्य करणाऱ्या सहा महिलांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उद्योग क्षेत्रात पुरस्कार राजश्री पाटील, नांदेड साहित्य डॉ.सुनीता बोर्डे, सांगली, कृषी भरती स्वामी, कराड, सामजिक लक्ष्मी नारायण, पुणे, पत्रकारिता शर्मिला कलगुटकर ठाणे तर क्रिडा क्षेत्रात शैलजा जैन, नाशिक यांना देण्यात आले असून या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रोख, व सन्मानपत्र देण्यात आले.
या पुरस्काराची २५ हजारांची रोख रक्कम मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमास माझ्याकडून खारुताई वाटा म्हणून देत आहे. हा पुरस्कार मला दिल्या बद्दल मी यशवंतराव चव्हाण सेंटरचे व माझ्या कार्यात आज पर्यंत ज्यांनी-ज्यांनी हातभार लावलेला त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड