जिल्ह्यातील दिव्यांग निधीसाठी झिजवतात आमदारांच्या ऑफिसच्या पायऱ्या
नांदेड दि.२४: नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात संख्या असून त्यांना नैसर्गिक दिव्यांगत्वामुळे रोजी रोटी कमाविणे अवघड झाले आहे. मजुरीही करता येत नाही त्यामुळे अनेक दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत दिव्यांगांना दरवर्षी ३० लक्ष रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लाखो रुपयांचा निधी त्यांच्याकडे वर्ग केला जातो परंतु जिल्ह्यातील आमदाराने दिव्यांगाचा निधी खर्च न करता जागेवरच ठेवून दिल्यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे नुकत्याच राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नांदेड शहरात संपन्न झाल्या आहेत त्यासाठी आमदारांनी 80 लाखांचा निधी देऊन नाच गाण्यांवर उधळला आहे. यावरून दिव्यांगांमध्ये नाराजी पसरली असुन नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दो-यावर आले असता बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी पालकमंत्र्यांकडे निधीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आढावा घेऊन त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्ह्यात आमदार व खासदारांना दिव्यांगांच्या उन्नतीसाठी मंत्रिमंडळाकडून निधी दिला जातो. तो निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यासाठी प्रत्येक आमदारांच्या कोठ्यात असतो परंतु जिल्ह्यातील नऊ आमदारांनी दिव्यांगांसाठीचा राखीव निधी वापरलाच नसून तो निधी दुसरीकडे वापरून एक प्रकारे दिव्यांगांवर अन्याय करताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या महसूल क्रीडा स्पर्धांवर आमदार फिदा होऊन नाच गाण्यांवर ऐंशी लाख रुपये त्यांनी उधळे आहेत परंतु दिव्यांग आजही एक वेळच्या जेवणासाठी व जीवन जगण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसत आहे . राज्य शासनाने दिव्यांगांना अद्यापही दिलासा दिला नसून त्यांची फरफराट अद्यापही संपली नाही. काही जणांचे हातपाय अपंग आहेत त्यांना चालता येत नाही तर काही जणांचे डोळे नाही अंधत्व आलेले आहे. तर काहि जनांना बोलता ऐकता येत नाही अशा अनेक दिव्यांगांना उपासमारीमुळे नाईलाजाने रस्त्यावर येऊन भिक मागून आपली उपजीविका चालवावी लागत आहे परंतु आमदार खासदार व प्रशासनाला यांची क्यू येताना दिसत नाही असे राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड