हिमायतनगर प्रतिनिधी/- पी .एफ .सी संस्था मुखेड व शाहीर महश्री आत्माराम पाटील शाहीर मंच आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत गाडगेबाबा जयंती व शाहीर आत्माराम पाटील जन्मशताब्दी निमित्त भव्य लोककला महत्त्वाचे आयोजन दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सुजलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी करण्यात आले असून या कला महोत्सवाचे उद्घघाटक खासदार रवींद्र चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव पाटील शेळगावकर स्वागत अध्यक्ष दत्ता तुमवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पाटील घोटाळकर प्रकाश पाटील भिलवंडे रुपेश देशमुख कुंटूरकर तर मार्गदर्शक म्हणून पत्रकार गजेंद्र गवई बुलढाणा संयोजक दिगु तुमवाङ शाहिर बळीराम जाधव सुजलेगावकर अदि सह कलावत उपस्थित राहणार असून या होणाऱ्या कला महोत्सवात सा.वारसदार चे संपादक बहुजन टायगर युवा फोर्स.व पारंपारिक शाहीर लोक कला संवर्धन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांना त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता कार्याबद्दल उल्लेखनीय काम असल्यामुळे त्यांना मान्यवरांच्या हस्ते कला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
पत्रकार त्रिरत्नकुमार भवरे यांनी नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नवोदित कलावंतांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलेले आहे ते दरवर्षी मोठमोठे कलावंताची शाहिरी जलसा व कला महोत्सव ठेवत असतात व त्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करतात कलावंताच्या न्याय हक्काकरता ते सदैव प्रयत्नशील असतात कलावंताच्या मागण्या बाबत त्यांनी अनेक वेळा भजन आंदोलन मोर्चा काढून कलावंतांच्या मानधनात वाढ करुन कलावंतांना त्यांनी न्याय मिळवून दिला कलावंताचे ते आधारस्तंभ म्हणून नांदेड जिल्ह्यात नावलौकिक आहेत अशा या अवलिया कवि गायक कलावंत पत्रकार त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांना कलाभूषण पुरस्कार जाहीर झाला असून आज मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रिफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे भवरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे बहुजन टायगर युवा फोर्स जिल्हाध्यक्ष शाहीर शंकरदादा गायकवाड पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाचे प्रदेशाध्यक्ष शाहीर रमेश नारलेवाड बहुजन टायगर युवा फोस॔ मराठवाडा अध्यक्ष बापूराव जमदाडे बहुजन टायगर युवा फोस॔ चे संघपाल कांबळे नागेश कांबळे पत्रकार अनिल मादसवार अँड ज्ञानेश्वर पंदलवाड पत्रकार विजय वाठोरे पत्रकार पांडुरंग मिरासे शाहीर सुभाष गुंडेकर गौतम राऊत बालाजी राऊत बसवंत कांबळे लक्ष्मणराव भवरे अशोक आळणे जय भीम पाटील डॉक्टर कैलास कांनिदे पत्रकार मनोज शिंदे आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे