हिमायतनगर प्रतिनिधी /- येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ योजनेअंतर्गत अंगणवाडी क्रमांक १३ पशुवैद्यकीय दवाखाना येथील अंगणवाडी मध्ये शून्य ते सहा वर्ष तथा अपंग लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न झाली…यावेळी विद्यार्थ्यांना त्यांची आरोग्य तपासणी संपन्न झाल्यानंतर त्यांना औषध उपचार तथा संदर्भ सेवा देण्यात आली यावेळी. माता- बालकांना स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगण्यात आले तसेच रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित डॉक्टरांनी सांगितल्या तसेच उपस्थित बालकांची वजन आणि उंची घेण्यात आली त्यानंतर डॉक्टरांनी काही मार्गदर्शक सूचना सांगितल्या तसेच यावेळी पाच अपंग लाभार्थ्यांची देखील तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉक्टर चमुच्या पथकामध्ये डॉ.विकास वानखेडे,डॉ. निंबाळेकर, यांच्या समवेत श्रीमती धुमाळे, श्रीमती मुनेश्वर
तसेच श्रीमती मामीडवार यांनी आरोग्य तपासणी संदर्भ सेवा दिली. यावेळी अंगणवाडी क्रमांक १३ सेविका सौ.छाया संदीप उमरे तथा मदतनीस कमल हनवते यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.. तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानामध्ये यशस्वी पणे सहभाग घेऊन विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका सौ. छाया संदीप उमरे यांचा आरोग्य विभागाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यामुळे त्यांचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे..