सौ.सदिच्छा वैजनाथ सोनी यांचा समाजपयोगी उपक्रम..
नांदेड दि.५: येथील बाबानगर – मगनपुरा भागातील सौ. सदिच्छा वैजनाथ सोनी यांच्या प्रतिष्ठाणावर हंळदी – कुंकू कार्यक्रमाचे आयोजन रथसप्तमीच्या मूहूर्तावर दि.४ फेब्रुवारी मंगळवार रोजी करण्यात आले होते सदरील कार्यक्रमात शाहूनगर,वसंतनगर,मगनपुरा भागातील शेकडो महीलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत वाणाची देवाण-घेवाण करत हळदी – कुंकूवाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती
या भागातील युवा महीला समाजसेविका असलेल्या सौ.सदिच््छा वैजनाथ सोनी यांनी आपल्या महीला मंचच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका अरुंधती ताई पुरंदरे, युवा नेत्या प्रणिता ताई देवरे चिखलीकर , आ.प्रताप पाटील चिखलीकरांच्या सौभाग्यवती सौ.प्रतिभाताई चिखलीकर, नगरसेवक प्रशांत तिडके यांच्या सौभाग्यवती सौ. सरिता तिडके,संघ समितीच्या नांदेड शहर कार्यवाहक सौ. रेणुताई देशपांडे, इंदिरा कंधारकर (नानी), साधना भानेगावकर, डॉ. प्रणिशा पाटील, सौ. सुकेशना गारोळे, गोकर्णा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजना पेरके, अनुसयाबाई राजुरे, राणी उराडे, रत्ना सोनवाल कल्पना मोरे , लक्ष्मीबाई पांचाळ यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे आरजे धनश्री इंगळे यांनी केले.
तृतीय पंथीयांचा विशेष सन्मान.!
समाजातील एक घटक असलेल्या तृतीय पंथीयांना समाजात वावरतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेत कार्यक्रमाच्या संयोजिंका सौ. सदिच्छा वैजनाथ सोनी यांनी तृतीयपंथीय असलेल्या आशा देवकर ,अनन्या देवकर यांच्यासह त्यांच्या समवेत आलेल्यांचा विशेष सन्मान करत त्यांच्याप्रति त्यांच्या मनात असलेली आदराची भावना व्यक्त केली या रंगतदार कार्यक्रम व सन्मानाबद्दल तृतीयपंथीयांनी सौ.सदिच््छा यांचे यावेळी मनपूर्वक आभार व्यक्त केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड