हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील मौजे पोटा येथे दत्त संस्थान कडून 3 दिवस भव्य यात्रा मोहत्सव भरविण्यात आला आहे त्या यात्रेत जुगार अड्डे ,मटका, व दारू अड्डे मात्र जोमात सुरू झाले आहेत ह्यावर स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचे व एल.सी.बी.चे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे त्यामुळे अनेक गोर गरीब नागरिकांचे संसार देशोधडीला लागत आहेत त्यामुळे भोकर उपविभागीय अधिकारी शाफकत आमना मॅडम ह्यांनी तात्काळ लक्ष देऊन यात्रेत जुगार अड्डे चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे….
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मोजे पोटा हे गाव तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ म्हणून ओळखली जाते या परिसरात सध्या दत्त जन्म निमित्त दत्त महाराजांची भव्य यात्रा महोत्सव दरवर्षी भरविला जातो या यात्रेमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेले जुगार अड्डे स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची गोपनीय माहिती पुढे आली आहे. पोटा परिसरात जुगार व्यावसायिकांचा धुमाकूळ मागील दोन दिवसांपासून या भागात अवैध जुगार अड्डे जोरात सुरू असल्याचे समजत आहे तरी पण स्थानिक पोलिसांचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे उघड उघड दिसत आहे हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी तात्काळ तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेऊन शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका बुक्कीसह, जुगार अड्ड्या वर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे जुगार अड्ड्यांमुळे नवतरुण युवक हा व्यसनाधीन होऊन जुगाराच्या आहारी जात आहे यात्रा म्हटल्यावर हौसे गौसे हे येत असतात त्यामुळे तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पोटा येथे भव्य जंगी यात्रा महोत्सव दरवर्षी भरवला जातो त्याच यात्रा महोत्सवामध्ये जुगार अड्डे सुरू आहेत या बाबीवर तात्काळ भोकर उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देऊन अवैध जुगार अड्डे चालवणाऱ्याच्या मुस्क्या आवळून त्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे
चौकट
जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ
तालुक्यातील पोटा येथील यात्रेमध्ये जुगार अड्डा सुरू झाल्यापासून अनेक जण जुगारामध्ये हजारो रुपये हरत आहे हा जुगार अड्डा सुरू राहिल्यास जुगार खेळणारे अनेक जण कर्जबाजारी होऊन त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे काही ग्रामस्थांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार केल्याचे सांगितले. मात्र पोलिसांकडून या यात्रेतील जुगार अड्डावर कुठलीही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तातडीने जुगार अड्डा बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.