हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- मृग नक्षत्र उन्हाळ्यात जमा होत असल्याने बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मृग नक्षत्र असे, एवढे उघाडीचे गेले असे कधी झाले नाही. असे शेतकरी बोलून दाखवित आहेत. रोहीण्या पूर्णता उघड्या गेल्या आणी मृग नक्षत्रातील जून महिन्यात पाऊसाला हुलकावणी दिली असल्याने खरिपाच्या पेरण्या अद्यापपर्यत खोळंबल्या आहेत तर काही शेतकऱ्यांच्या नगरा आकाशाकडे लागले आहेत..
हिमायतनगर तालुक्यात कायमस्वरूपी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने एका खरिपाच्या हंगामावरच या भागातील शेतकऱ्यांना वर्षाच्या बारा महिण्याच्या खर्चाची तजवीज करावी लागते. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला विशेष महत्व मानले जाते. मृग नक्षत्रातील पेरणी ही लाभदायक असते, असा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे. म्हणून मृग नक्षत्रात पेरणी करणे महत्वाचे मानले जाते. परंतू या वर्षी रोहीण्या उघड्या गेल्या, मृग नक्षत्रात मोसमी पाऊस अपेक्षित होता. आता नक्षत्रास सुरू होवून अनेक दिवस उलटून जात आहेत. परंतू पाऊस पडत नाही. परिणामी खरिपाच्या पेरण्या लांबत चालल्या आहेत. गेल्या मे महिन्यात या भागात चांगला बे मोसमी पाऊस बरसला होता. परंतू जून महिना पावसाचा असून, अजूनही पावसाचा पत्ता नाही. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली असून, उन्हामुळे सजीवसृष्टी प्रभावित झाली आहे. आता केव्हा पाऊस बरसेल याचीच उत्सूकता सर्वाना लागली आहे. तालूक्यात सर्व शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची पुर्व तयारी केली असून पेरणीसाठी लागणाऱ्या बि बीयाणे व रासायनिक खताची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. ऐपतदार शेतकर्यानी बि बीयाणे खरेदी करून सोयीच्या ठिकाणी साठवणूक केली आहे. तर काही शेतकऱ्याकडे बियाणे खरेदीसाठी पैसाच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.काहींही करूण खरीपाची पेरणी करावीच लागणार म्हणून बळीराजा आपले सर्वस्व पणाला लावून खरिपाच्या पेरणीसाठी आतूर झाला असून पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. उन्हाच्या तिव्रतेतून केव्हा सुटका होणार आणी पाऊस केव्हा पडणार याचीच उत्सूकता सर्वाना लागून आहे.