हिमायतनगर प्रतिनिधी/-शहरातील बोरगडी रोड येथे असलेल्या पाण्याच्या टाकी जवळील महाकाली मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री गुरु साईनाथ बडवे महाराज यांच्या हस्ते गावची ग्राम माता महाकाली मातेचा महाअभिषेक करून येथील गादीचे पूजन व झेंडा पूजन करून शहरातील मुख्य रस्त्याने पालखी मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीचे मुख्य आयोजक आग्या राम देवकर यांच्या महाकाली शक्ती महोत्सव कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील शेकडो देवकर मंडळींनी उपस्थितीती लाऊन शहरातील सर्व देवी देवतांना ग्रामप्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीमय वातावरणात महाकाली शक्ती महोत्सव संपन्न केला….
याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पु. संत श्री शेवंता माय निवघा बा. व प. पू. संत श्री गणपत महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शु.६ शके १९४६ नुसार दिनांक सात डिसेंबर रोजी शहरातील बोरगडी रोड येथे असलेल्या महाकाली मंदिराचे सेवेकरी संजय मादसवार यांच्या जागेतील महाकाली मातेचा महा अभिषेक सोहळा व गादी पूजन व झेंडा पूजन झाल्यानंतर गावातील मुख्य रस्त्याने शेकडो पोतराज व देवकरांच्या उपस्थितीत गावातील सर्व देवी देवतांना ग्रामप्रदक्षणा घालून सायंकाळी लाड जागेचे भूमिपूजन करून हा महाकाली शक्ती वार्षिक महोत्सव साजरा केला जातो या महोत्सवाचे आयोजक आग्याराम देवकर व महाकाली भजनी मंडळ यांनी केले होते यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी, देवकराणी व पोतराज मंडळीनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली असल्याचे पाहायला मिळाले यावेळी दिगंबर महाराज, चांदराव बनसोडे, दत्ता महाराज,श्री पापण्या पोतराज,राजू पोतराज,नागोराव पोतराज, मल्लय्या स्वामी, नागोराव पोतराज, लक्ष्मीबाई गंगाधर गड्डमवार, मिनाबाई मंडोजवार, अनुसयाबाई बनसोडे, गंगाबाई लिंगमपल्ले, कमलबाई जाधव, सखुबाई पोचिराम बनसोडे, परमेश्वर नरहरे, बाळू देवकर महागाव, मोहन भारती, गोपी गिरी, वनिता सोळंके, आनंद गायकवाड, सह असंख्य पोतराज मंडळी , देवकर मंडळी सह गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते