नांदेड दि.१७: नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. नांदेड शहरामध्ये ज्या ज्या वेळी हिंदू समाजावर अन्याय झाला, अत्याचार झाला त्यावेळी सर्वप्रथम मीच हिंदूंच्या बाजूने उभा राहिलो आहे असे पक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांनी सांगितले आहे.
हिंदुत्ववादी मतदार कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभनाला बळी पडणार नाही. राजकीय पक्षाचे काम करत असताना व माझी पत्नी सौ वैशाली देशमुख नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून लोकप्रतिनिधी करत असताना माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये व इतर प्रभागांमध्ये मी विकासाच्या अनेक योजना राबविलेल्या आहेत. मी आज पर्यंत ८० टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करत आलेला सामान्य कार्यकर्ता आहे. नागरिकांच्या नागरी समस्यांचा मला चांगला अभ्यास असून त्या कशा पद्धतीने सोडविल्या पाहिजेत हेही मला चांगले ठाऊक आहे. मला नांदेड उत्तर चे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली तर मी या संधीचे सोने करेल असे मिलिंद देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
नांदेड शहरांमध्ये ज्या वेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर अडचणीचे प्रसंग येतात त्यावेळी मी सर्वप्रथम त्यांच्या मदतीसाठी धावून गेलेलो आहे. आज हिंदुत्वाचा कळवळा ज्या मी त्यांना आलेला आहे, हे सर्वजण ज्यावेळी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभा राहण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र पुढे येत नाहीत व सोयीची भूमिका घेतात. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदार बंधू भगिनी हिंदुत्वाच्या रक्षणाची खरीखरी काळजी घेणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या पाठीशी राहतील असा आत्मविश्वास बोलून दाखवला आहे.राजकारणामध्ये अनेक जणांनी हिंदुत्वाच्या नावावर व आम्ही हिंदुत्वाचे रक्षणकर्ते आहोत म्हणून मते मागितली, व्यासपीठावर हिंदुत्वाचा उदोउदो केला परंतु ते कधीही हिंदुत्व अडचणीत आल्यानंतर मदतीसाठी धावून आले नाहीत. ज्यावेळी सकल हिंदू समाजाने हनुमान मंदिरात महाआरती केली होती त्यावेळी काही जात्यंध लोकांनी दगडफेक करून महाआरती थांबवण्याचा प्रयत्न केला होता त्याला तोडीस तोड उत्तर मिलिंद भाऊ देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देऊन हिंदुत्ववाद्यांना मानसिक बळ व मदत केली होती. माझ्या समाजकारणामध्ये व राजकारणामध्ये सातत्याने माझी नाळ हिंदुत्ववादी विचारांची सातत्याने जोडलेली असल्याने नांदेड उत्तर विधानसभेतील सांस्कृतिक हिंदुत्ववादाला मानणारा समाज माझ्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचे दर्शन 20 नोव्हेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल. ही निवडणूक जनतेने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असल्यामुळे व निष्ठावंत तळमळीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्यामुळे मला ही निवडणूक अत्यंत सोपी जात आहे. माझ्या समर्थक कार्यकर्त्यांनी डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा अतिशय सक्षमपणे राबवून प्रत्येक मतदारांना संपर्क केला आहे. माझा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा अजेंडा प्रत्येक मतदाराला समजावून सांगितला आहे. नांदेड उत्तरचा सर्वांगीण विकास म्हणजे नागरिकांना मूलभूत सुविधा व सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार यासाठी माझे प्राधान्य राहणार आहे.धर्म जागरण असो, रामललाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यामध्ये घरोघरी जाऊन अक्षदा वाटप करण्याचा कार्यक्रम असो, श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, धर्म प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यामध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ते एकमेव नेतृत्व आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने उभा टाकलेला मतदार संघ असल्यामुळे संकटाच्या वेळी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी धावून येणाऱ्या उमेदवारासाठी पाठीशी राहण्याचा निर्धार करून अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार विविध कॉर्नर बैठकांमध्ये व्यक्त केला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड