विजय पाटील
लातूरदि.१२:शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.१२)सायंकाळी हनुमान चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सभेस माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार,आ.रमेशअप्पा कराड,माजीमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. लातूर शहर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.ताईंच्या भेटीगाठी, पदयात्रा,कॉर्नर बैठका आणि सभांना मोठी गर्दी होत आहे. मतदार डॉ.अर्चनाताईंना समर्थन देत आहेत.प्रचार मोहिमेने गती घेतली असून आता जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. मंगळवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हनुमान चौक येथे सभा होणार आहे.माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा हे या सभेस मार्गदर्शन करणार आहेत.माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,आ.अभिमन्यू पवार, आ.रमेशअप्पा कराड,माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,
शिवसेना नेते ॲड.बळवंत जाधव,जिल्हा प्रमुख सचिन दाने,राष्ट्रवादीचे मकरंद सावे,प्रशांत पाटील,रिपाइंचे डी.ई. सोनकांबळे यांच्यासह महायुतीतील पक्षांच्या नेत्यांची या सभेस प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सभेस भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना पाठबळ व्यक्त करावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर