विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.६: १९ वर्षीय तरुणीवर पित्यानेच बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वाळूज महानगरात समोर आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीच्या आईचे ७ वर्षांपूर्वी निधन झालेले असून, ती वडील व दोन भावांसह वाळूज महानगरात राहते. तिच्या मोठ्या भावाला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी घराबाहेर राहतो. लहान भाऊ रात्री कंपनीत जातो. तरुणी रात्री एकटीच घरात राहत असल्याने तिच्या विकृत पित्याचीच तिच्यावर नजर फिरली. दोन महिन्यांपासून तो तिच्या अश्लील वर्तन करत होता. मात्र ती बदनामीच्या भीतीने त्रास सहन करत होती. पित्याच्या अश्लील वर्तनाची माहिती तिने शेजारीच राहणाऱ्या मामा-मामीला दिल्यानंतर ते तिला झोपण्यासाठी आपल्या घरीपीडित तरुणीच्या आईचे ७ वर्षांपूर्वी निधन झालेले असून, ती वडील व दोन भावांसह वाळूज महानगरात राहते. तिच्या मोठ्या भावाला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी घराबाहेर राहतो. लहान भाऊ रात्री कंपनीत जातो. तरुणी रात्री एकटीच घरात राहत असल्याने तिच्या विकृत पित्याचीच तिच्यावर नजर फिरली. दोन महिन्यांपासून तो तिच्या अश्लील वर्तन करत होता. मात्र ती बदनामीच्या भीतीने त्रास सहन करत होती. पित्याच्या अश्लील वर्तनाची माहिती तिने शेजारीच राहणाऱ्या मामा-मामीला दिल्यानंतर ते तिला झोपण्यासाठी आपल्या घरी घेऊन जात होते. त्यामुळे संतापलेला नराधम तिला शिवीगाळ, मारहाण करून मामाच्या घरी झोपण्यासाठी जाऊ नको, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत होता.
ती घरात असताना तो सतत तिच्याशी लगट करून तिचे अंतरवस्त्र जाळून टाकत असायचा. रविवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी पाचला तरुणी घरात एकटी असताना त्याने तिला जवळ ओढून मिठी मारत बलात्काराचा प्रयत्न केला. त्याच्या कृत्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केल्याने मामीने धाव घेत तिची सुटका केली. सायंकाळी मामा घरी आल्यावर त्यांना हा प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर मामा-मामीच तिला घेऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गिते करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर