हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- तालुक्यातील मौजे पार्डी येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे गावातील अवैध देशी विक्री करणाऱ्याला सांगून सुद्धा त्यांनी ही दारू विक्री अद्याप बंद केली नसल्याने येथील ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत सार्वत्रिक ठराव घेऊन संबंधित अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर येथील पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी ह्यासाठी 14 जून रोजी हिमायतनगर येथील पोलीस निरीक्षक यांच्या कडे एक लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे..
तालुक्यातील मौजे पार्डी येथील ग्रामपंचायत हद्दीत मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने येथे नेहमी वादविवाद भांडण तंटे होऊन येथील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनते कडे वळत असून दारूच्या नशेत येथील महिला व मुलींना मोठ्या प्रमाणात रात्रीला नाहक त्रास देत आहेत त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त तसेच उघड्यावर पडत आहेत चक्क येथील एका महिलेस तर घर सोडण्याची वेळ उद्भवत आहे त्यामुळे येथील पोलीस प्रशासनाने गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे दि 14 जून रोजी समस्त गावकऱ्यांनी एक लेखी तक्रार देऊन केली आहे ह्या तक्रारी सोबत ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव सुद्धा येथील पोलीस प्रशासनास दिला आहे गेल्या काही महिन्यापासून हनुमान गुंडेवाड, गजनान गुंडेवाड सह परमेश्र्वर येलकेवाड यांच्या कडून गावात अवैध दारू विक्री चालू आहे अनेक वेळा येथील स्थानिक बीट जमादार यांना गावकऱ्यांनी तोंडी व लेखी सांगून सुद्धा त्यांनी ह्यांच्यावर कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही काही तरी तुटपुंजी कारवाई करून ह्या प्रकरणातून आपले हात काढून घेत येथील अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ते पाठीशी घालत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे ह्या प्रकरणाकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी गांभीर्याने घेऊन संबंधित अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे
पार्डी येथील अवैध दारू विक्री मुळे येथील एका महिलेने चक्क गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे व दररोजच्या अन्याय अत्याचाराला कंटाळून येथील असंख्य महिलांनी दिनांक 13 जून च्या रात्री ग्रामपंचायतवर हल्लाबोल केला होता त्यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती कल्याणबाई पांडुरंग रोतुलवाड व तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण नरसिंगा निम्मेवाड यांच्या नेतृत्वाखाली काल गावात सार्वत्रिक एक बैठक घेऊन गावातील चोरट्या मार्गाने होत असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यासाठी ठामे ठोक निर्णय घेऊन येथील ग्रामसभेमध्ये सार्वत्रिक ठराव घेऊन तो दि 14 जून रोजी येथील पोलीस स्टेशन कार्यालयात आणून देण्यात आला व सदर गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात आली नाही तर येत्या आठ दिवसात गावातील सर्व महिला व पुरुष मंडळींना घेऊन हिमायतनगर येथील पोलीस स्टेशन कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा येथील ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी पार्डीच्या सरपंच श्रीमती कल्याणबाई पांडुरंग रोतुलवाड व तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण नरसिंगा निम्मेवाड आदी ग्रामस्थांनी उपस्थित राहून निवेदन दिले आहे…