अमित देसाई
ठाणे दि.२९: संजय केळकर हे सर्वसामान्य लोकांशी संवाद ठेवणारे आमदार आहेत, प्रामाणिक आहेत तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि केळकर कुटुंबियांचे फार जुने संबंध आहेत. केळकरांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचे आहे, असे रामदास आठवले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे जोडले आहे की राहुल गांधी किती ओरडले तरी संविधान कोणी बदलू शकत नाही. असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाण्यात केले.
सोमवारी ठाण्यातील खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्ताना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, भाजपा ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, आर पी आय चे श्री. वाघमारे, सचिन पाटील, राजेश गाडे, विशाल वाघ, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष वेगळे असले तरी देशासाठी काम करायला पाहिजे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी चांगले काम केल्याने सरकार नक्कीच येईल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत खोट्या नरेटिव्हचा फटका अनेक जागावर महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र त्यानंतर ही केंद्रात नरेंद्र मोदी यांचेच सरकार आले.
#सत्यप्रभा न्यूज #ठाणे