तात्पुरते स्थगित झालेले उपोषण पुन्हा सुरू.
यावेळेस तरी दोषीवर कारवाई होणार का
नागेश शिंदे
हिमायतनगर: हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत नरेगा नळ योजनेची विहीर पाणी फिल्टर मशीन व १५ व्या वित्त आयोगातून लहान मुलांचे अंगणवाडीतील साहित्य दलित वस्ती मधील कामे अंतर्गत नाली सह इतर गावातील विविध विकास कामाचे अंदाजपत्रक बनवून लाखो रुपयांचा निधी परस्पर सरपंच ,उपसरपंच, तत्कालीन ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी हडप केल्यामुळे ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्व पुरावे गोळा करून येथील ग्रामस्थांनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते तेव्हा लेखी आश्वासन देऊन गावातील ग्रामसभेमध्ये तुमच्या मागण्या मान्य करू असे सांगून तात्पुरत्या वेळेसाठी स्थगित केलेले उपोषण त्यांच्या ग्रामसभेमध्ये मागण्या मान्य न झाल्यामुळे आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी पुन्हा उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळेस तरी आमच्या ग्रामस्थांना न्याय मिळणार का ? असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत इसवी सन 2022 -23 मध्ये गावाच्या विकासासाठी नरेगा नळ योजनेची विहीर,गावातील नागरिकांना पाणी फिल्टर मशीन व 15 व्या वित्त आयोगातून लहान मुलांना अंगणवाडीतील साहित्य, दलित वस्ती मधील कामे ,अंतर्गत नाली व इतर विविध विकास कामाचे अंदाजपत्रक तयार करून संबंधित सरपंच ,उपसरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी पंचायत समिती येथील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्या विकास कामाचे खोटे अंदाजपत्रक तयार करून गावात कुठलीही कामे न करता एकंबा ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते तेव्हा येथील गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन तुमच्या मागण्या ग्रामसभे मध्ये मान्य करू असे सांगून तात्पुरत्या वेळेसाठी हे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती त्या नुसार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी एकंबा येथे सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या ग्रामसभेमध्ये संदर्भ क्रमांक पाच नुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुद्दा क्रं १.रोजगार सेवक यांना कमी करणे ,२.गावात वाटर फिल्टर बसविणे बाबत 3.अंगणवाडी साहित्य तात्काळ देणे बाबत . शाळा डिजिटल करणे सह 5. गावातील अंगणवाडी ची जागा देणे बाबत असे ठराव घेणार असल्याचे सांगून ग्रामसभा लावली होती पण वेळप्रसंगी ग्रामसेवक व सरपंचांनी उडवा उडवी चे उत्तरे देत ह्या ग्रामसभेतून पळ काढला त्यामुळे गावातील नागरिकांच्या प्रश्नाचे निराकरण न झाल्यामुळे समस्त ग्रामस्थांनी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर पुन्हा एकदा भ्रष्टाचारा विरोधात तेच आमरण उपोषण पुन्हा सुरू केले आहे त्यामुळे यावेळेस तरी ग्रामस्थांना न्याय मिळणार का ? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे ह्याची जिल्हा प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे…
आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही :-वैभव कंदेवाड
नुकतीच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे पण एकबा येथील ग्रामस्थांनी न्याय हक्कासाठी तहसील प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे याची सुद्धा स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधी दखल घेऊन आचारसंहिते पूर्वी आम्हाला न्याय मिळवून द्यावा व दोषीवर कार्यवाही करावी अन्यथा या भ्रष्टाचार्यांना जो कोणी लोकप्रतिनिधी पाठीशी घालेल त्यांना आगामी विधानसभेमध्ये गावात पाय ठेवू देणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी वैभव कंदेवाड यांनी दिला आहे.
#सत्यप्रभा न्युज #हिमायतनगर