दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१५: तालुक्यातील त्रिवेणी संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महामार्गावरून जाणाऱ्या सिरजखोड फाटा येथे भारताचे मिसाईलमॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या यांच्या जयंतीदिनी प्रतिमेच्या चौकाला पुष्पहार अर्पण करून समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
एका सामान्य गरीब कुटुंबातून आपल्या स्वबळावर पेपर विकत स्वतःच्या कर्तुत्वावाने जगाच्या पाठीवर नाव गाजविले अशा या महान क्रांतिकारी महापुरुष डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे महान विचार समाजात रुजावे या उद्देशातून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड