मोकळी जागा दिसेल तिथे लावण्यात येतात फ्लेक्स …विचित्र अपघातांना निमंत्रण
महापालिका प्रशासनाचा कानाडोळा …???
नांदेड दि.११: शहरात दोन्ही रस्त्याच्या मध्यभागात असलेल्या लाईटच्या पोलवर मर्यादित जागेच्या लहान आकाराच्या फ्लेक्सची परवानगी असतेवेळी संबधित अॅडव्हरटायर्झसच्या वतीने मोठ-मोठ्या आकाराचे फ्लेक्स लटकावून नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात असून या प्रकारामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच विचित्र अपघातांना निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे चित्र दिसून येते आहे ..
शहरातील मुख्य भागांमध्ये अनधिकृत उभारलेल्या मोठमोठ्या फलकांचा बाजार दिसून येत आहे. महापालिकेची परवानगी न घेता हे फलक लावण्यात आल्याने व त्यांच्यावर इतक्या वर्षात ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत फलकांनी शहरातील मुख्य बाजारपेठाही भरल्या आहेत.
शहरातील गर्दीची ठिकाण ही महत्वाची व जाहिरातीसाठी फायद्याची समजली जातात. त्यामुळे या भागांमध्ये कायमच जाहिरात फलकांची गर्दी दिसून येते. सध्यतर यातील बहुतांशी भागात मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत.
नियम बनवले जातात, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे अनधिकृत होर्डिंगची संख्या वाढत असल्याचं बोललं जात आहे यामुळे होणाऱ्या त्रासाला व अपघातांना सामान्य नांदेडकरांना सामोरे जावं लागत आहे ….
मुंबईतल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यातील मोठमोठ्या आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला होता तो आता काहीसा बाजूला पडला असे वाटू लागले आहे आणि संबधित अॅडव्हरटायर्झसच्या अधिकच्या आकाराच्या होर्डींगवर महापालिका व जिल्हा प्रशासनाने लक्ष वेधून कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून होत आहे .
परवानगी नसलेलं हे अधिक क्षमतेचं होर्डिंग लावण्यास कोणी परवानगी दिली आणि याला जबाबदार कोण ?
नांदेड शहराच्या चहू बाजूने परवानगीपेक्षा अधिक मोठ्या आकाराचे होर्डींग उभे करून महापालिकेचा महसूल व अपघातांना निमंत्रण अशा दोन्ही बाजूंनी सामान्य जनता मात्र त्रस्त असे चित्र दिसून येत आहे याबाबत अधिकची माहीती घेतली असता महापालिकेच्या वतीने परवानगी दिली नाही असे असतांना त्याठिकाणी मोठ-मोठे फ्लेक्स धोकादायक रित्या लटकाविले जात आहेत तरी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून सदरील प्रकाराला आळा घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे
अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग कशी ओळखायची ?
ज्या होर्डिंगवर लायसन्स नंबर, एक्सपायरी डेट हे लिहिलेलं असते, ती सर्व अधिकृत होर्डिंग असतात. ज्यावर हे लिहिलेलं नाही, ती अनधिकृत होर्डिंग असतात.
तसंच, नागरिकांना आपल्या महापालिकेच्या वेबसाईटवर अनधिकृत होर्डिंगची तक्रार करता येते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड