नांदेड दि.२७: विगर बायोटेक प्रा.लि.इंदौर द्वारा आयोजित नविन संशोधीत सोयाबीन मालविका पिक पाहणी कार्यक्रम व शेतकरी सन्मान मेळावा नांदेड येथे कपील देव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी बोलताना कपिल देव म्हणाले की हवामानातील बदलामुळे शेती करणे आतीशय कठिण झाले आहे.कधी दुष्काळ तर कधी आती वर्षीटीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.प्रसंगी शेतकरी आत्महत्या करत आहे.शेतकरी हा जगाचा पौशिंदा आहे,तो जगला पाहिजे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता नविन तंत्रज्ञानाची कास धरुन बदलत्या हवामानातील अतिशय परिपुर्ण संशोधीत सोयाबीन वाण मालविकाची कास धरुन आपली अर्थीक उन्नती साधली पाहिजे.नांदेड जिल्ह्यातील 15000 शेतकरी बंधूनी कार्यक्रमास हाजरी लावली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड