मुंबई दि.२६: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रूनूकसानीचा हा खटला दाखल केला होता माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषघ ठरवताना १५ दिवसाचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला आहे आयपीएस कलम ५०० अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यात या प्रकरणी सुनावणी सुरू होती.
सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजेच उच्च न्यायालयात आव्हान देतात का ? हे लवकरच कळेल संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यही आणि बदनामीकारक आहेत असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता
मेदा सोमय्या प्रोफेसर
याप्रकरणी त्यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती भादंवि कलम ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे मेधा सोमय्या या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्या माटुंगाच्या रुईया कॉलेजमध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीच्या प्राध्यापक आहेत.
राऊतांनी काय केले आरोप केलेले?
सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिल देऊन पैसे उकळले पर्यावरणाचा हास झाल्याची कारण दाखवून हा घोटाळा झाला आहे एकूण १०० कोटीचा हा घोटाळा आहे घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे असे राऊत म्हणाले होते.
#सत्यप्रभा न्युज #मुंबई