छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
विजय पाटील
दि : २५मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत; पण सरकार आरक्षण देत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या बेरोजगार तरुणांना नोकरी लागत नसल्याने लग्नही होत नाही. त्यामुळे मी माझ्या जीवनाचा त्याग करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून ३० वर्षीय समाधान देऊबा पवार (रा. जातवा, ता. फुलंब्री) याने सोमवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.
समाधान अल्पभूधारक असून, त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. शिक्षण घेऊनही तो बेरोजगार आहे. उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी जेसीबी चालवित होता. रविवारी पितृपक्षासाठी गावी आला होता. त्याने चिठ्ठी लिहून विष पिले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात आणले.
डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात दोन वृद्ध आई, भाऊ व बहीण असा परिवार आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आता तरी मायबाप सरकारने मनोज दादा जरांगे यांच्या मागणीचा विचार करावा, असे त्याने चिठ्ठीत म्हटले असून, भावाला उद्देशून प्रिय बाळूदादा, आपल्या दोन आईची काळजी घे, असे म्हटले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर