लातूर प्रतिनिधी !विजय पाटील दि : २३ येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था अंतर्गत सर्व अस्थापनातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन थाटामाटात संपन्न झाले.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुपोषपाणि आर्य यांच्या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, विद्यार्थी मैदानात मनसोक्त खेळावा, विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक योग्य वाढ व्हावी, यासाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन दिनांक 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे.
क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारोहासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य सहसचिव अंजुमनी आर्य, गटशिक्षणाधिकारी शेख, ऍड. रमाकांत चटणाळे, श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत खंदारे, पर्यवेक्षक राहुल लिमये, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते, श्यामलाल प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक विवेक उगिले, निमंत्रित सदस्य, सर्व आस्थापनातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी शेख यांनी श्यामलाल हायस्कूलमध्ये होत असलेल्या क्रीडा सप्ताहाचे कौतुक केले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक आहेत, विद्यार्थी मैदानात खेळले पाहिजेत, यासाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था चांगले उपक्रम आयोजित करत आहेत, याबद्दल संस्थेचे व शाळेचे अभिनंदन केले. असेच विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रमाचे आयोजन यापुढेही करावे, सर्व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा गटशिक्षणाधिकारी शेख यांनी दिल्या.
संस्थाध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य यांनी क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन वेळोवेळी करत असते. अशा सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या क्रीडा गुणांना, कलागुणांना वाव द्यावा, एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट कलावंत म्हणून नावलौकिक प्राप्त करावा असा संस्थेचा मानस आहे, त्यासाठी आम्ही विविध उपक्रमाचे आयोजन हेतूपूर्वक करत असतो. यास विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद आहे , विद्यार्थ्यास हे सर्व उपक्रम आवडतात त्यासाठी पालकांनीही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अशा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी व वेळ उपलब्ध करून द्यावे, व आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होईल याकडे लक्ष द्यावे. असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक भारत खंदारे यांनी क्रीडा सप्ताहामध्ये कोणकोणत्या क्रीडा कौशल्यांचे प्रदर्शन व स्पर्धा होणार आहेत यासंबंधी माहिती सांगितली. क्रीडा मार्गदर्शक शिक्षक दिनेश बोळेगावे, राहूल गुरमे, अन्तेश्वर बिरादार, संग्राम घोगरे यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे व्यवस्थितरित्या नियोजन व कार्यवाही करण्यासाठी योगदान दिले. क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
#सत्यप्रभा न्यूज # लातूर