जालना दि.२०: जालना – बीड महामार्गावरील अंबड तालुक्यातील मठतांडा येथे शुक्रवारी (ता.20) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बस व ट्रॅकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू तर बारा जन गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.संपुर्ण मयताची ओळख पटलेली नाही. अपघातातील जखमीला अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी आठ वाजता अंबड शहराकडून संत्रा घेऊन जाणारा माल ट्रक व गेवराईकडून जालना शहराकडे जाणाऱ्या बसची समोरासमोर वळण रस्त्यावर जोराची धडक झाली.या घटनेची माहिती मिळताच मठतांडा व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या काचा फोडून बसमधील गंभीर जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या व मृत व्यक्तीचे लास व जखमीना अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मयतामध्ये गेवराई आगारातील बसचा वाहक गेवराई तालुक्यातील वडगाव डोक येथील बंडू बारगाजे (वय 55) वर्षे व रामपुरी (ता. गेवराई) येथील पंचफुला भगवान सोळुंके (65) वर्षे, मुरादेवी येथील सतीश देविदास नाईक,जब्बार शेख, मेहकर येथील राहिबाई रंगनाथ कळसाईत,यांचा मयतामध्ये सामावेश असल्याची माहिती मिळाली आहे.उर्वरीत एकजणाची ओळख ओळख अद्यापही पटलेली नाही. जखमीमध्ये गणेश कचरुसिंग सागर (येळबा ता शिरूर), सिध्देश्वर गणेश क्षीरसागर, गोरखशनाथ खत्रे (वाहेगाव ता. गेवराई),भारत बन्सी हिंदुडे (मारकरवाडी ता. शिरूर), प्रभाकर भाऊराव गाडेकर (रेवकी देवकी ता. गेवराई), बापूराव कृष्णा निकम (साडेगाव ता. अंबड), शिफा मोसिन बागवान (शहागड ता. अंबड), आर्शिया बागवान (सेलू), आफिका बागवान (सेलू), युसरा सोहेल शेख(सेलू), कमल प्रभाकर गाडेकर (रेवकी देवकी), विजय कुमार रावल (उत्तराखंड), कमल रमेश रावल (उत्तराखंड), कलावती कुऱ्हाडे (सुखापुरी),कार्तिक कुऱ्हाडे (
सुखापुरी ता. अंबड), भारत क्षीरसागर (शिरूर ), ओंकार घुगे (साष्टपिंपळगाव ता. अंबड), अंजली दुधाने (साष्टपिंपळगाव), प्रवीण अनिल सुरासे(अंतरवाली सराटी), अफसाना सोहेल शेख (अंतरवाली सराटी) यांचा जखमी मध्ये समावेश आहे.
चौकट: अंबड -जालना महामार्गावरील झिरपी फाटा ते मठतांडा परिसरात अनेकदा अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. महामार्गावर सार्वजनिक बांधकामं विभागाने दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. तसेच वळण रस्ता व पूल याबाबत सूचना देणे गरजेचे आहे.
#सत्यप्रभा न्युज #जालना