हिमायतनगर प्रतिनिधी/- येथील तहसील कार्यालय येथे नुकतेच महाराष्ट्र शासनाची एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊन हिमायतनगर येथील तहसील कार्यालय येथे पुरवठा निरीक्षक म्हणून छाया नागरथवार यांची निवड झाली आहे त्यांनी नुकताच येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यामुळे हिमायतनगर शहरातील व तालुक्यातील पुरवठा विभागाला आलेली मरगळ कर्तव्यदक्ष नागरथवार मॅडम यांच्यामुळे आता सुरळीत होणार असल्याच्या भावना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासह राशन लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले आहे ….
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथील तहसील कार्यालया अंतर्गत अनेक राशन दुकानचा कारभार पुरवठा विभागामार्फत चालवला जातो मागील काही दिवसापासून हिमायतनगर येथील पुरवठा विभागांला आलेली मरगळ पाहता नांदेड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत हिमायतनगर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हे पद मागील अनेक दिवसांपासून रिक्त होते या पदावर आता कायम स्वरूपी पुरवठा निरीक्षक म्हणून नुकत्याच एम.पी.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या छाया नागरथवार यांनी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक पदी रुजू होऊन येथील पदभार स्वीकारला आहे त्यामुळे नागरथवार मॅडम यांनी येथील पुरवठा विभागाचा पदभार स्वीकारल्यामुळे येथील पुरवठा विभागाला आलेली मरगळ व संथ गतीने चालणारी कामे आता वेग घेतील अशा भावना शहरासह तालुक्यातील राशन लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत नागरथवार मॅडम एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांचा नवखा अनुभव हिमायतनगर शहरातील पुरवठा विभागाला नक्कीच उभारी देऊन तालुक्यातील गोरगरीब कष्टकऱ्यांची कामे करण्यासाठी उपयोगास ठरेल अशा भावना शहरातील सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहेत यावेळी विरसणी येथील पोलीस पाटील निलेश पाळजकर, पत्रकार नागेश शिंदे ,अमोल पाळजकर, सोनु देवसरकर सह आदी जन उपस्थित होते