नांदेड दि११: स्वस्त धान्य दुकानातील धान्याची तस्करी करणारा ट्रक मंगळवारी सकाळी देगलूर ते उदगीर रोडवरील कारेगाव येथे पोलीसांनी पकडला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून नदिड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्यावतीने ऑपरेशन फ्लॅशआऊट मोहिम सुरु केली आहे. स्वस्त धान्य दुकानातील धान्य ट्रकमध्ये मरुन काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणाऱ्या पोलीसांच्या पथकाला मिळाली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही. एस. आरसेवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पहाटे देगलूर ते उदगीर रोडवरील मौजे कारेगाव येथे सापळा रचुन ट्रक क्र. एमएच २६ बीडी ८०५१ हे वाहन थांबविले. पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गहू व तांदळाचे भरलेले ११५ पोते किंमत १ लाख २० हजार रुपयांचा माल पोलीसांना आकडून आला. या संदर्भात ट्रक चालकाकडे पोलीसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते. त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी १ लाख २० हजार रुपये किंमतीचे स्वस्त धान्य व २२ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा २३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या संदर्भात पुरवठा विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशिर कारवाई केली जाणार आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड