ता. प्र. दत्तात्रय सज्जन धर्माबाद दि.१०: तालुक्यातील मौजे चिकना येथील महिला सरपंचाच्या घरात चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर धर्माबाद पोलिसांनी आज धाड टाकून तब्बल १२ जुगा-यांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील वृत्त लिहीपर्यंत धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
मौजे चिकना येथील सरपंच पती तथा सामाजिक वनीकरण विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी विश्वास आत्माराम आवरे हे आपल्या घरामध्ये पत्त्याचा क्लब चालू केल्याचे विश्वसनीय वृत्त धर्माबाद पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश माकुरवार व त्यांच्या टीमने सापळा रुचून सरपंचाच्या घरावर धाड टाकली. त्यामध्ये सरपंच पती विश्वास आवरे या क्लब चालकासह गंगाधर धारबा आवरे,ईश्वर मारुती आवरे, नागनाथ संभाजी आवरे,अवधूत गंगाधर आवरे, साहेबराव दशरथ आवरे ,साईनाथ दिगंबर जुन्गुलवाड, केशव शामराव कदम, शेख जलील ,अब्दुल रहीम खादर, रमेश दिगंबर झुंगुलवाड, साहेबराव साहेब ढेले यांना रंगेहात पकडून अटक केली असून चार दुचाकीसह एक लाख ३५ हजार ९४० रुपयाचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड