लोकसभेला निलंगेकरांनी प्रतिष्ठा लावून गायकवाडांना उमेदवारी न मिळाल्याने उदगीरमध्ये रसद घेऊन बळ.
युती असो वा नसो विश्वजित गायकवाड निवडणुकीच्या मैदानात.
बनसोडेंचा हजारो कोटींचा विकास तरी विजयाचा फरक अल्प असणार असल्याने तोच फरक मोडण्याचा निलंगेकर – गायकवाड अभद्र युतीचा डाव.
जावेद शेख लातूर दि ८: एके काळी सुसंस्कृतपणा असलेले लातूर जिल्ह्याचे राजकरण दिवसेंदिवस अत्यंत खालच्या व नीच पातळीवर जात असून जातीय द्वेष या नीच राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.विशेषतः अल्पसंख्याक असोत किंवा दलित या समाजाविषयी भाजप असेल किंवा काँग्रेस या पक्षातील जे प्रस्थापित नेतृत्व आहे, यांची विषारी नीती दिवसेंदिवस समोर येत आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव हा त्याचाच एक भाग होता.सुधाकर शृंगारे यांचा फक्त पराभव झाला नाही तर जिल्ह्यातील एक प्रभावी दलित चेहरा यानिमित्ताने पद्धतशीर संपवला गेला.आणि आता आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रस्थापित दिग्गजांना देखील लाजवेल असा दैदिप्यमान विकास उदगीरमध्ये केल्याने उद्या आपल्याला संजय बनसोडे जड नको,किंवा जिल्ह्यात आणखीन एक पर्यायी नेतृत्व आणि ते देखील दलित समाजाचे प्रस्थापित होऊ नये म्हणून अगदी सोबत राहून पद्धतशीर काटा काढण्याचा कट रचला जातोय.लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मंत्रालयातील हेव्हीवेट अधिकारी अनिल गायकवाड यांचे सुपुत्र विश्वजीत गायकवाड प्रचंड इच्छुक होते.आणि त्यांची शिफारस संभाजी निलंगेकर पाटील यांनी केली होती.विश्वजीत गायकवाड हे माजी खासदार सुनील गायकवाड यांचे पुतणे आहेत.2019 ते 2024 या कालखंडात सुनील गायकवाड यांनी अक्षरशः संभाजी निलंगेकर पाटील हे कसे टक्केवारी घेतात,कसे कसे भाजपमधील नेत्यांचे राजकिय आयुष्य उध्वस्त करतात पासून ते अगदी वैक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन जाहीर अगदी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडियावर टीका करत होते.मात्र एकाएकी निलंगेकर यांना गायकवाड यांच्यात काय दिसले आणि अगदी निलंगेकर यांना चोर म्हणण्यापर्यंत सुनील गायकवाड हे गेलेले असताना अचानक निलंगेकर यांच्यासारखा नेता नाही अशी भूमिका का घेतली तर गायकवाड यांना कोठुन ना कोठुन उमेदवारी हवी होती आणि निलंगेकर यांना देखील आर्थिक मजबूत असलेला बकरा पाहिजे होता जेणेकरून त्याला पुढे करून जे प्रभावी दलित आहेत त्यांना संपवायचे होते,हा त्यांच्या रणनीतीचा भाग होता.शीवाय 2019 ते 2024 निलंगेकर यांना विरोध करताना सुनील गायकवाड यांनी अभिमन्यू पवार आणि रमेश कराड या भाजप नेत्यांच्या गटात सामील झाले होते,मात्र 2024 ला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना पवार आणि कराड यांनी गायकवाड यांच्यापेक्षा शृंगारे यांना पसंती दिल्याने सुनील गायकवाड सध्या निलंगेकर गटात गेले आहेत.आणि लोकसभा निवडणुकीत निलंगेकर- गायकवाड युतीने भाजप उमेदवाराच्या पराभवात अगदी सर्व अर्थाने हातभार लावला.आणि आता यांनी आपला मोर्चा उदगीरकडे वळवला असून विश्वजीत गायकवाड हे मतदारसंघात फिरत असून मोठ्या प्रमाणात वाटप सुरू आहे. आणि विश्वजीत गायकवाड हे उदगीर विधानसभा लढणार आहेत,कोणत्याही माध्यमातून हे आता स्पष्ट झाले असल्याने संजय बनसोडे यांनी हजारो कोटींचा विकास केला असला तरी सध्या त्यांना जो विरोध होतो आहे तो पाहता बनसोडे यांचे विजयाचे मार्जिन फार फार 10 – 20 हजार एवढे राहील, आणि विश्वजीत गायववाड जर अपक्ष थांबले तर ते तेवढेच मत आणि संजय बनसोडे यांचेच खाणार हे जगजाहीर असल्याने उद्या चालून सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातुन मंत्रिपद देत असताना अडसर नको म्हणून एक तर स्पर्धक आणि दुसरा प्रभावी दलित चेहरा संपवणे या दोन हेतूने अगदी पध्दतशीर काम सुरू आहे.
सध्या लातूर जिल्ह्यात अजित पवार यांच्याविरोधात जे नेरेटिव्ह सेट केले जात आहे त्याची मुहूर्तमेढ भाजप नेते संभाजी निलंगेकर पाटील यांनी रोवली. लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव हा भाजपच्याच नेत्यांच्या रणनीतीचा भाग होता,कट होता.आणि हे खापर ज्यावेळी प्रदेश भाजपचे नेते लातूरला माहिती घेण्यासाठी आले असता संभाजी निलंगेकर पाटील यांनी अजित पवार यांच्यावर फोडले. अजित पवार सोबत आल्याने आपला पराभव झाला अशी थेरी संभाजी निलंगेकर पाटील यांनी मांडली.आणि त्याची सुधारित आवृत्ती आत्ता आत्ता भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, गणेश हाके यांनी मांडली.आणि त्यानुसार आता जिल्ह्यातील अजित पवार गटाचे अस्तित्व विशेषतः जे स्वतःच्या राजकीय वाटचालीत अडसर ठरू शकतात आणि प्रस्थापित होऊ शकतात असे नेतृत्व संपवण्यासाठी अगदी पद्धतशीर कट रचले जात आहेत.अर्थात राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्याला ज्यावेळी मंत्रिपद देण्याची वेळ आली त्यावेळी प्रतीक्षेत असलेले संभाजी निलंगेकर पाटील यांच्याऐवजी संजय बनसोडे यांची थेट कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली.तो भाग वेगळा की त्यामागे जातीय गणित होती,व दलित चेहरा आहे आणि एस.सी मतदारसंघातून निवडून आलेला आहे म्हणून अजित पवार यांनी त्यांची वर्णी लावली होती.मात्र आगामी काळातील राजकारण पाहिले तर अजित पवार यांच्याकडे संजय बनसोडे हाच एकमेव प्रभावी दलित चेहरा आहे.त्यामुळे जर उद्या सत्ता आली तर आणखीन तेच निकष लावले गेले तर आपल्याला मोठी अडचण होऊ शकते हे संभाजी निलंगेकर पाटील यांना चांगलेच ठाऊक आहे.शिवाय जर तसे झाले तर संजय बनसोडे हे जिल्ह्यात प्रस्थापित होतील,आणि दलित चेहरा प्रस्थापित व्हावा ही लातूर जिल्ह्यातील काँग्रेस असेल किंवा भाजप या पक्षातील नेत्यांची मानसिकता नसल्याने, प्रस्थापित फक्त मराठेच असावेत,मग ते कोणत्या का पक्षात का असेनात, ही मानसिकता असल्याने जिल्ह्यात आणखीन एक प्रस्थापित नको म्हणून पद्धतशीर कट रचण्यास सुरुवात केली आहे.आणि लोकसभा निवडणुकीत देखील सुधाकर शृंगारे यांना विरोध करण्यामागे हीच मानसिकता होती.आणि त्यामुळे संभाजी निलंगेकर पाटील यांनी गायकवाड यांना जवळ केले होते,कारण गायकवाड हे पैसा देखील खर्च करू शकतात आणि त्यातून आपला उद्देश देखील सफल होऊ शकतो हे संभाजी निलंगेकर पाटील यांना ठाऊक होते.2019 ते 2024 सुधाकर शृंगारे खासदार असताना ज्यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू झाली,त्यावेळी संभाजी निलंगेकर पाटील यांनी विश्वजीत गायकवाड यांची शिफारस स्वतः केली, आणि इतरांना पण करायला लावली.मात्र संभाजी निलंगेकर पाटील यांना शह देत शृंगारे यांनी थेट दिल्लीतुन आपली उमेदवारी आणली.आणि तेथेच संभाजी निलंगेकर पाटील यांनी शृंगारे यांच्या पराभवाचा पाया रचला.कारण एक तर एक टर्म खासदार आणि दुसऱ्या टर्मसाठी जर शृंगारे आपल्याला ओव्हरटेक करून उमेदवारी आणू शकत असतील तर उद्या केंद्रात सत्ता स्थापन करताना जातीय निकष आणि दुसरी टर्म या जोरावर मंत्री झाले तर जिल्ह्यात दलित चेहरा निर्माण होऊन आणखीन एक घर निर्माण होईल म्हणून शृंगारे यांचा पराभव केला गेला हे जिल्ह्यातील दलित समाजाने समजून घेण्याची गरज आहे.विशेषतः निलंगा आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील दलित समाजाने विचार करून कसे कसे दलित समाजाच्या नेत्याला त्रास दिला याचा विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीत भूमिका घेतली पाहिजे.शृंगारे यांना राजकीयदृष्ट्या संपवल्यानंतर आता मोर्चा संजय बनसोडे यांच्याकडे वळवला गेला आहे आणि येथे देखील गायकवाड यांचा वापर केला जातो आहे.आणि लोकसभा निवडणुकीत शिफारस करून देखील उमेदवारी न मिळालेले विश्वजीत गायकवाड यांना उदगीर मतदारसंघात नादाला लावले आहे.आणि गायकवाड देखील पायाला भिंगरी लावून फिरत आहेत,गावागावात जाऊन कोठे वह्या – पुस्तकं वाट, कोठे दप्तर वाट असे प्रकार करत आहेत.अर्थात असलेले आर्थिक बळ हे त्यांची एकमेव शक्तिकेंद्र आहे आणि त्याच शक्तिकेंद्राने संभाजी निलंगेकर यांना अक्षरशः शिव्या खाऊन देखील मोहिनी घातली आहे,हे दुर्दैव की सुदैव हे निलंगेकर यांनीच ठरवावे.म्हणजे एकीकडे बघा,2014 ला विधानसभा निवडणुकीत पडल्यानंतर 2014 ते 2019 अक्षरशः झपाटल्यासारखे गाव,वस्ती,तांडा अगदी गल्लीबोळात पाच वर्षे संजय बनसोडे फिरले.2019 ला ते परत निवडणुकीत थांबले, विजयी झाले. एकाच टर्ममध्ये आमदार, राज्यमंत्री,कॅबिनेट मंत्री पर्यंत मजल मारून हजारो कोटींचा विकास, अखिल भारतीय नाट्य संमेलन असो किंवा देशाच्या राष्ट्रपतीना उदगीरमध्ये आणणे हे संजय बनसोडे यांनी केले.असे असताना आज संजय बनसोडे हे बाहेरचे आहेत असा नेरेटिव्ह सेट केला जात आहे.असे असताना उदगीर सोडा,लातूरमध्ये विश्वजीत गायकवाड कोण हे माहिती नसताना ज्यावेळी विश्वजीत गायकवाड हे निवडणूक लढणारच अशी भूमिका घेत असतील तर त्यांचा उद्देश स्वतः निवडून येणे नव्हे तर संजय बनसोडे यांना पाडणे आहे,आणि विश्वजीत गायकवाड यांना पाठिंबा आणि बळ संभाजी निलंगेकर पाटील यांचे आहे हे लोकसभा निवडणुकीतच स्पष्ट झाले आहे.त्यामुळे हजारो कोटींची कामे संजय बनसोडे यांनी केलेली असताना देखील बदलत्या राजकीय परिस्थितीत,जातीय गणितात उदगीर मतदारसंघात विजयाचे मार्जिन हे फार फार तर 10 ते 20 हजार असणार आहे हे कांही वेगळे सांगायला नको,त्याला राज्यातील भाजप विरूद्ध असलेली नाराजी देखील आहे.आणि ती पाहता पराभव होईल अशी परिस्थिती असताना ज्यावेळी थोड्या मार्जिनमध्ये जागा येईल अशी आशा आहे ती संजय बनसोडे यांच्या कामामुळे आणि संपर्कामुळे आहे.आणी तेच मार्जिन तोडण्यासाठी आणि परिणामी संजय बनसोडे यांचा पराभव करण्यासाठी विश्वजीत गायकवाड यांना बळ दिले जाते आहे हे अगदी उघड आहे.म्हणजे 4 सप्टेंबर रोजी देशाच्या राष्ट्रपती या उदगीरमध्ये येऊन गेल्या,संजय बनसोडे यांचा कार्यक्रम असताना विश्वजीत गायकवाड यांनी सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिराती त्याच्या स्वतःच्या नावाने केल्या.त्यात संजय बनसोडे यांचा कोठे उल्लेख देखील नाही.आणि त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रस्थापित नेत्यांनी दांडी मारली.अर्थात एका दलित नेत्याचे ऐश्वर्य पाहायचे मानसिकता नसल्याने हे अपेक्षित होतेच.आणि तेच ऐश्वर्य संपवणे यासाठी विश्वजीत गायकवाड यांना संभाजी निलंगेकर पुढे करत आहेत.अर्थात ते धर्मार्थ नाही,कारण निलंगेकर हे फुकट कोणाचा काटा काढत नाहीत हा त्यांच्या राजकारणाचा गुणधर्म आहे.त्यामुळे पडद्याआड काय काय डील झाल्या असतील हे दोघांनाच माहिती, अर्थात लोकसभा निवडणुकीत कोटींची चर्चा होती ती आज देखील आहेच.असो,त्यामुळे महायुतीत असताना देखील संजय बनसोडे यांना त्रास दिला जातोय हे उघड आहे.जर अजित पवार महायुतीत नाही राहिले तर विश्वजीत गायकवाड हे भाजपकडून उमेदवार असतील आणि त्यादृष्टीने ते तयारी करत आहेत असा देखील युक्तिवाद विश्वजीत गायकवाड यांचे समर्थक आणि त्यांना समर्थन देणारे निलंगेकर परिवार करू पाहत आहेत.अर्थात आज निवडणूक कांही महिन्यावर असताना महायुती तुटेल की नाही किंवा तुटली तरी ती भाजपची रणनीती असेल असे अनेक कंगोरे जोडता येऊ शकतील.शिवाय उद्या खरच महायुती तुटली तर भाजपकडून संजय बनसोडे हे उमेदवार असले तर नवल वाटायला नको.आणि ही देखील बाजू संभाजी निलंगेकर पाटील यांच्या लक्षात आली नसेल असे बिलकुल नाही.कारण लोकसभा निवडणुकीत ज्यावेळी भाजपच्या उमेदवार बदलाची चर्चा सुरू होती ,त्यावेळी संजय बनसोडे यांचे नाव भाजपकडून जवळपास अंतिम झाले होते,मात्र ते होऊ शकले नाही,त्याची कारणे आज सांगण्याची गरज नाही.मात्र सांगण्याचे तात्पर्य हेच की भाजपला संजय बनसोडे हे वाईट नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत असलेले संजय बनसोडे यांचे संबंध पाहता भाजपला दलित चेहरा हवा असेल तर ऐनवेळी संजय बनसोडे यांना देखील भाजप उमेदवारी देऊ शकते,अर्थात महायुती तोडण्याचे ठरल्यास. आणि ते देखील संभाजी निलंगेकर पाटील यांना पचनी पडणार नाहीये किंवा परवडणारे नाहीये हे लक्षात घेऊनच निलंगेकर सध्या विश्वजीत गायकवाड या लंगड्या घोड्यावर दाव लावत आहेत.अर्थात त्यांचा उद्देश हा गायकवाड यांच्याप्रति फार चांगला आहे असा नाही,मात्र संजय बनसोडे यांना पाडण्यासाठी विश्वजीत गायकवाड पुरेसे आहेत हे त्यांना माहिती आहे.आणि त्याच परिणामी त्यांना पुढे करून जिल्ह्यातील राहिलेले एकमेव प्रभावी दलित नेतृत्व संपवणे आणि आपल्या राजकीय वाटचालीतील अडसर दूर करणे हा एकमेव उद्देश संभाजी निलंगेकर पाटील यांचा आहे हे मात्र अगदी स्पष्ट आहे. अर्थात ते कोणाला दिसतंय आणि कोणाला नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे.आणि सोबतच विधानसभा झाल्यावर सुनील गायकवाड यांनी सोशल मीडियावर परत संभाजी निलंगेकर पाटील यांना शिव्या देण्यास सुरुवात केली तर नवल वाटायला नको.पडद्याआड जे चाललंय त्यातून जिल्ह्यातील विशेषतः निलंगा आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील दलित समाजाने आपला शत्रू पक्ष नसून त्या पक्षातील प्रस्थापित नेतृत्व आहे हे दलित नेतृत्व संपवू पाहतेय, याचा सारासार विचार करून आपली रणनीती आखण्याची गरज आहे.
#सत्यप्रभा न्युज #लातूर