धर्माबाद ता. प्र. दत्तात्रय सज्जन दि.२६: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व मुख्यमंत्री नमो शेतकरी योजना धर्माबाद तालुक्यातील विविध मागण्या संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्याकडे सदरच्या गोरगरीब शेतकऱ्याचा विचार करून व शासनाचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अंगठ्यामुळे ई.के.वाय सी.होत नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ पर्याय काढून शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेचे व मुख्यमंत्री नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळवून देण्या करिता संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून अहवाल मागून घेउन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा वयोवृद्ध शेतकऱ्याच्या हाताचे ठसे येत नसल्यामुळे ई.के.वाय.सी. होत नाही. या सदरील शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजना व मुख्यमंत्री नमो योजनेपासून वंचित आहेत .
परंतु सदरची जाचक अटी म्हणजे ई.के वाय.सी.ची अट घातल्यामुळे शेतकऱ्याचे अंगठे येत नाही.आधारला मोबाईल नंबर सुद्धा लिंक होत नसल्यामुळे वयोवृद्धांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळत नाही तरी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावे,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन धर्माबाद तालुक्यातील 63 मयत शेतकऱ्यांचे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीमध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ धर्माबाद या शाखेच्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे मयत शेतकऱ्यांचे वारसदार वंचित राहिले आहेत असे सहाय्यक निबंध यांच्या कार्यालयाकडून बँकेने त्या साईडवर जाऊन कागदपत्रे अपलोड केले नाहीत पत्रामध्ये नमूद केले आहे व
2०१९ व २०२० मध्ये वारसांनी संबंधित बँकेला आवश्यक ते सर्व कागदपत्राची पूर्तता केली होती.
तरी संबंधित शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत तरी या योजनेची साईट चालू करून मयत शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न हा मार्गी लावून वारसांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्याकडे नागनाथ माळगे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #धर्माबाद #नांदेड