मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
नांदेड़ दि.१५ :भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७७ वा वर्धापनदिन १५. ऑगस्ट रोजी सकाळी ८.०५ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायले तसेच पोलीस दलाने व अग्निशमन दलाने झेंड्यास सलामी दिली. तत्पूर्वी आयुक्तांच्या निवासस्थानी सुद्धा ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मनपाचे माजी पदाधिकारी व माजी सन्माननीय सदस्य, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त कारभारी दिवेकर, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य लेखापरीक्षक तु.ल.भिसे, सहाय्यक संचालक नगररचनाकार आलुरकर, नगररचनाकार पवार, लेखाधिकारी श्री चन्नावार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, मो.गुलाम सादेक, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, संभाजी काष्टेवाड, निलावती डावरे व अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड