हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे दि.२५: शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढीवारी श्री क्षेत्र आळंदी येथे जाण्यासाठी पायी वारी दिंडी चालक श्री ह.भ.प.मोहन महाराज शिवूरकर यांच्या नेतृत्वात शहरातील असंख्य महिला व भाविक भक्त पंढरपूरच्या वाटेने पाऊले चालती पंढरीची वाट असे गाणे गात आज दिनांक 25 जून रोजी शहरातील जागरूक देवस्थान श्री परमेश्वर देवस्थान मंदिरातील श्री परमेश्वर महाराज यांचे दर्शन करून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले यावेळी परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ सह आदी संचालक मंडळानी सर्व भाविक भक्तांचे स्वागत केले….
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील असंख्य वारकरी व भाविक भक्त दिनांक 25 जून रोज मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढीवारी श्री क्षेत्र आळंदी येथे जाण्यासाठी पायी वारी दिंडी चालक श्री ह.भ.प. मोहन महाराज शिवुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहरासह तालुक्यातील अनेक भाविक भक्त त्यांच्या दिंडीत सहभागी होऊन हिमायतनगर शहराचे ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन निघाले या दिंडी सोहळ्या मध्ये जाणाऱ्या भाविक भक्तांचे श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ सह सर्व संचालकांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या ही पायी दिंडी लोणंद येथे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन फलटण, नातेपुते, माळशिरस वाकरी मार्गे पंढरपूर अशी जाणार असल्याचे परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या संचालिका सौ. लताताई मुलगे यांनी सांगितले या पायी दिंडीचा ठीक ठिकाणी मुक्काम करत दिंडीचा प्रवास सुरू असतो गेली पंचवीस वर्षे सलग 20 दिवसांचा प्रवास करत सर्व भाविक भक्त व वारकरी या पायी दिंडी प्रवासात टाळ, पताका, मृदंग, हरी नामाच्या गजराच्या समूहात 100 ते 150 वारकरी तल्लीन होऊन विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरपूर कडे रवाना होत असतात या सर्व भाविक भक्तांचे श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ, अनंता देवकत्ते, सौ. लताताई मुलगे, संजय माने, विलास वानखेडे, भोयर गुरुजी, विठ्ठल कदम,गणेश वाघबरे सह आदी जणांनी पायी दिंडीवारीतील भावीक भक्तांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या….