नांदेड दि.२५: First 18th Lok Sabha Session : लोकसभेच संसदीय अधिवेश सुरू असून नवनिर्वाचीत खासदारांना शपथ दिली जात आहे. यामध्ये महाराष्ट्राती बहुतांश खासदारांनी शपथ घेतल्यानंतर वेगवेगळ्या घोषणा दिल्या आहेत. यामध्ये जळगावच्या नवनिर्वाचीत खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेस खासदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र, जय शिवराय अशी घोषणात दिली. तसंच, अकोल्याचे खासदार संजय शामराव धोत्रे यांनी जय जवान जय किसान तर, वर्ध्याचे खासदार अमर शरदराव काळे यांनी जय शिवराय जय भीम अशी घोषणा दिली. दरम्यान, हिंगोलीचे नवनिर्वाचीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथ घेताना स्व. बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या वडिलांचे नाव घेतल्याने त्यांना लोकसभा अध्यक्षांनी थांबवलं आणि जे लिहून दिलं आहे तेच वाचाव असा आग्रह केला. त्यानंतर आष्टीकर यांनी पुन्हा शपथ घेतली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड