हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे दि.१८: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर तीन शिक्षक पात्र असताना तिथे केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. आणि ती पण शाळेला येत नाही ह्याची वारंवार प्रशासनाकडे ग्रामस्थांनी तक्रार करूनही येथील शाळेला शिक्षक न दिल्याने शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या दुसऱ्या दिवशी येथील संतप्त झालेल्या पालकांनी आज दि 18 जून रोजी शाळेस कुलूप ठोकले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग असून येथील पट संख्य 70 ते 80 आहे. येथे नियमानुसार तीन शिक्षक कार्यरत असायला पाहिजे मात्र येथील 70 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक कार्यरत आहे आणि तो पण वेळेवर शाळेत येत नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी वेळोवेळी प्रशासनास भेटून येथे कायम स्वरुपी शिक्षकाची मागणी करूनही त्याची पूर्तता होऊ शकली नाही त्यामुळे शाळेचा कार्यभार सांभाळून पाच वर्गांची जबाबदारी एकाच शिक्षकावर येऊन पडली खरी पण परिणामी प्रशासनाने येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे लक्ष न दिल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान होत आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी येथील शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी आज दि 17 जून रोजी शाळेस कुलूप ठोकून शाळेच्या आवारात शिक्षका विना शाळा भरविली व हिमायतनगर तालुका गटशिक्षण अधिकारी यांना फोन द्वारे संपर्क करत या शाळेवर तात्काळ शिक्षक उपलब्ध करून द्या अन्यथा जोपर्यंत शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप न उघडण्याची भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे यावेळी आदित्य संतोष राठोड,दयाराम आडे,विनायक राठोड,प्रवीण जाधव,विष्णू राठोड,विजय आडे,सचिन जाधव,शुभम राठोड,अनिल करपे,मनोहर आडे रोहन राठोड सह आदी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #हिमायतनगर