हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे दि.१७: हिंगोली लोकसभेच्या विजयानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची विधानसभा वाईज आज दि 17 जून रोजी हिमायतनगर शहरातील बालाजी शाळा येथे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आहे त्या बैठकीला विधानसभा संपर्कप्रमुख सचिन चराटे व शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड. परमेश्वर पांचाळ यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक संपन्न झाली
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदु हृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर या बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसैनिक व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. परमेश्वर पांचाळ यांनी असे सांगितले की मागील लोकसभेच्या निवडणूकी पेक्षा या निवडणुकीमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचे मोठे योगदान पहायला मिळाले निष्ठावंत शिवसैनिकांनी केलेल्या कामाचे फलित म्हणून हा विजय आपल्याला मिळाला आहे या हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विजयासाठी जी मेहनत घेतली त्याचे फलित म्हणून आपल्याला हा विजय मिळालेला आहे असाच विजय आगामी होणाऱ्या हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपल्याला मिळून द्यायचा आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहून जो पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे कामाला लागा असे आदेश आज दि 17 जून रोजी घेण्यात आलेल्या हदगाव हिमायतनगर विधानसभा आढावा बैठकीमध्ये त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख दिगांबर पाटील वाळकिकर,
हदगाव हिमायतनगर विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील चऱ्हाटे,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,अवधूत पाटील देवसरकर, मुधोळकर सर, तालुका संघटक संजय काईतवाड, तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे, संतोष पुलेवार,श्रीराम माने पाटील, उप तालुका प्रमुख विलास वानखेडे,युवा सेना तालुका प्रमुख योगेश पाटील सोनारीकर,अल्पसंख्यांक तालुका प्रमुख जफर लाला, इद्रिस शेवाळकर,शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार , राम नरवाडे,राम गुंडेकर, शुभम दंडेवाड, बबलू डांगे,प्रल्हाद पाटील सुर्यवंशी,विशाल अल्लवाड ,शेक युनुसभाई सोनारीकर,दिपक चव्हाण सह असंख्य शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #हिमायतनगर