जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी मातेचे उपोषण
नांदेड दि.१७: शहरालगत असलेल्या पुयनी ता. जी. नांदेड येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबतची तक्रार रेल्वे महामार्ग पोलीस नांदेड यांच्याकडे दाखल केली आहे, परंतु अद्यापही पळून नेणार यांचा शोध लावला नसल्यामुळे मुलीच्या मातेने जिल्हाधिकारी कार्यालया पुढे तक्रार देऊन उपोषण सुरू केली आहे.
पुयनी पाटी निळा रोड, येथील रहिवासी असलेल्या लोंढ परिवारातील मुलगी वय १७ वर्षे हिस दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता नांदेड रेल्वे स्टेशनवरून तिला लग्नाचे लग्नाचे आमिष दाखवून पळून नेलेले आहे. नांदेड रेल्वे स्टेशन येथे जलद नंदिग्राम रेल्वेने मांगीरबाबा येथे देवदर्शन साठी जात असताना आरोपी गोविंद उर्फ सचिन गणेश खुणे यांनी माझ्या मुलीला
लग्नाचे अमिष दाखवून फुश लावून पळून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने रेल्वे पोलीसाकडे दाखल केले आहे, परंतु अद्यापही त्या मुलीचा व पळून नेणाऱ्यांचा शोध लागला नसल्यामुळे याचा त्वरित शोध घेऊन माझी मुलगी मला परत द्यावी. या मागणीसाठी मुलीचे माता महानंदा लोंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया पुढे उपोषण सुरू केले आहे. रेल्वे महामार्ग पोलीस स्टेशन
नांदेड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती परंतु रेल्वे महामार्ग पोलीस नांदेड यांनी ही तक्रार नोंदवून न घेता दिरंगाई करून ६ मे २०२४ रोजी त्यांनी एफ. आर. आय दाखल केला. त्यामुळे या कारवाईला विलंब झाला या अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करावी व माझ्या मुलीला पळून नेणाऱ्यांना शोध घ्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे उपोषण सुरू केले आहे.
#सत्यप्रभा न्युज