कंधार दि.२: तालुक्यातील कल्हाळी येथील एका वृद्ध निराधार महिलेला दोन वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदारांकडून मोफत धान्य मिळत नव्हते. याबाबत फुलवळ येथील अँड. उमर शेख यांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार गणेश मोहिजे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. मोहीजे यांनी लगेच याची दखल हेऊन त्या वृद्ध महिलेची नवीन आरसी बनवली. स्वस्त धान्य दुकानदाराला धान्य उपलब्ध करून देण्यासंबंधी सूचना केल्या. तदनंतर वृद्ध महिलेला धान्य मिळाले. कल्हाळी येथील श्रीमती सुजलाबाई गिरी (वय ७०वर्ष) ही महिला मठात राहून हलाखीचे जीवन जगते. तिला पूर्वी मोफत धान्य मिळायचे. गेल्या दोन वर्षापासून तिची आरसी शेतकरी कुटुंबात असल्याचे कारण देत रास्त भाव दुकानदार त्या महिलेला मोफत धान्य देत नव्हता. यामुळे त्या महिलेवर उपासमारीची वेळ आली होती. मठात मिळणाऱ्या अन्नावरच तिची गुजराण होत असे. धान्य मिळावे यासाठी ती वृद्ध महिला तहसील कार्यालयात चकरा मारून मारून बेजार झाली होती. कुणीच त्याची दखल घेतली नाही. अँड. उमर शेख यांनी या महिलेला धान्य मिळावे, यासाठी पुढाकार घेतला. पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार गणेश महिजे यांना प्रत्यक्ष भेटून वृद्ध महिलेची कैफियत मांडली. धान्य मिळत नसल्याने महिलेचे कसे हाल होत आहेत हे समजावून सांगितले. नायब तहसीलदार गणेश मोहिजे यांनी तत्काळ याची दखल घेतली. महिलेची नवीन आरसी बनवून
कल्हाळी येथील दुकानदार यांना फोन करून या महिन्याचे धान्य उपलब्ध करून द्यावे असे सांगितले. त्यामुळे त्यांना तात्काळ धान्य मिळाले. नवीन आरसी मिळाल्यामुळे वृद्ध महिलेला जगण्याचा आधार मिळाला.
मौजे कल्लाळी येथील श्रीमती सुजलाबाई गिरी (वय ७० वर्ष) या महिलेला कोणतेही मूल बाळ, पती, नातेवाईक असे कोणीही नाही. अशा निराधार आजीला धान्य मंजूर करण्यात येऊन संबंधित धन्य दुकानदार यांना धान्य देणे आदेशित केले आहे. आणि आजी यांच्याकडून संपूर्ण कागदपत्रे घेऊन तात्काळ ऑनलाईन करून देण्यात आले आहे.अन्नसुरक्षा योजनेची खरे लाभार्थी आजी होती.पण ती अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित होती.अशा वंचित लाभार्थी आजीला मातार पणीचा धान्यांचा लाभ देऊन आधार देण्यात आला. गणेश मोहिजे
नायब तहसीलदार
पुरवठा विभाग कंधार
#सत्यप्रभा न्युज #नांदेड